नाशिक

पदकविजेत्‍या सर्वेशचा मविप्रतर्फे सत्‍कार

CD
फोटो : H31862 नाशिक : ‘मविप्र’चा माजी विद्यार्थी आणि भारताचा उंच उडीपटू सर्वेश कुशारे याचा सत्कार करताना मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे आणि सभापती बाळासाहेब क्षीरसागर. समवेत सर्वेशचे वडील अनिल कुशारे, आई सुलोचना कुशारे पत्नी रोहिणी कुशारे आदी. -------- सर्वेश कुशारेच्या यशामुळे तरुणांना प्रेरणा ॲड. नितीन ठाकरे : ‘मविप्र’कडून सन्मान सोहळा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १० : आशियाई क्रीडा स्पर्धेत उंचउडी क्रीडा प्रकारात रौप्यपदकाची कमाई करणारा मविप्र संस्थेचा माजी विद्यार्थी सर्वेश कुशारे याचा संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला. सर्वेशने आपल्या उल्लेखनीय कामगिरीतून देशासह देवगावचे नाव उज्ज्वल केले असून, त्याच्या यशामुळे क्रीडा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांना नवी प्रेरणा मिळाली आहे, असे गौरवोद्‌गार मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी काढले. मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे आणि सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते देवगाव येथे सर्वेश कुशारे याच्या निवासस्थानी त्याचा सन्मान करण्यात आला. या वेळी त्याचे वडील अनिल कुशारे, आई सुलोचना आणि पत्नी रोहिणी यांचाही गौरव केला. ग्रामस्‍थ, संस्‍था सभासद उपस्‍थित होते. ॲड. नितीन ठाकरे म्हणाले, सर्वेशने आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर मिळवलेले यश अभिमानास्पद आहे. मविप्रचा माजी विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करून पदक मिळवतो, ही संस्थेसाठी आनंदाची, अभिमानाची बाब आहे. खेळाडूंच्या गुणवत्तेला योग्य संधी, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते जागतिक स्तरावर निश्चितच आपला ठसा उमटवू शकतात. सभापती क्षीरसागर म्हणाले, की सर्वेशच्या यशामागे त्याची कठोर मेहनत, शिस्त, जिद्द आणि कुटुंबीयांचे मोलाचे योगदान आहे. खेळामध्ये यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण सरावाबरोबरच कुटुंबाचा पाठिंबा आणि समाजाचे प्रोत्साहन महत्त्वाचे असते. सत्काराप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी पशुसंवर्धन सभापती संजय बनकर, माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब बोचरे, गजीराम खुळे, अनिल बोचरे, नामदेव बोचरे, दत्तात्रेय बोचरे, सचिन बोचरे, अरुण गावडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी पोलिसांच्या ताब्यात; सहाशेपेक्षा जास्त आंदोलकांना पोलिसांनी उचललं, आकाशवाणीजवळ दगडफेक

Balinga Dhonwade Road : कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावरील दोनवडे-बालिंगा रस्त्याचे काम अपूर्ण; प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात, कधी पूर्ण होणार काम?

मुंबईची मुलगी... रियाच्या घरी पोहोचले पोलीस! CJP आंदोलनाची केली चौकशी अन्... नेमकं काय घडलं? Video

Marathi News Live Updates : दिल्लीनंतर आता मुंबई-पुण्यातही आंदोलकांची धरपकड, १५० जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

''ज्या देशाने परकियांचा माज उतरवला, तिथे स्वकियांचा माज जनता उतरवणार नाही वाटतं का?'' राज ठाकरे संतापले...

SCROLL FOR NEXT