Yeola Bazar Samiti esakal
नाशिक

Yeola Bazar Samiti : बाजार समिती सभापतीपदी सविता पवारांना झुकते माप; भुजबळांकडे सर्वाधिकार

सकाळ वृत्तसेवा

Yeola Bazar Samiti : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. सभापतीसह उपसभापतीपद निवडीचे सर्वाधिकार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांकडे आहेत. त्यामुळे ते कुणाला संधी देणार याविषयी तर्कवितर्कही लावले जात असून सविता पवार व संजय बनकर यांच्या नावाची अधिक चर्चा आहे. (Savita Pawar tipped for post of Yeola Bazar Samiti Chairperson Bhujbal has all rights nashik news)

बाजार समितीचे सभापतीपद मानाचे आणि तितकेच प्रतिष्ठेचे असल्याने या पदावर संधी मिळण्याची सर्वांनाच अपेक्षा असते. मागील तीन पंचवार्षिकपासून येथील बाजार समितीवर भुजबळांच्या पॅनलचीच सत्ता आहे. त्या माध्यमातून उषाताई शिंदे, आमदार नरेंद्र दराडे, सहकार नेते अंबादास बनकर या मातब्बरांना सभापतीपदाची संधी मिळाली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भुजबळांच्या नेतृत्वाखालील पॅनलला १८ पैकी १३ जागा मिळाल्या. तर, दोन अपक्षांनी पाठिंबा दिल्याने संचालकांची संख्या १५ झाली आहे. त्यामुळे भुजबळ, माजी आमदार मारोतराव पवार, युवा नेते संभाजी पवार व सहकार नेते अंबादास बनकर यांची एकहाती सत्ता आली आहे.

आगामी निवडणुकांच्या प्रार्श्‍वभूमीवर बेरजेच्या राजकारणाचा विचार करून कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांनाच सभापतीपदी संधी देणे क्रमप्राप्त असून, भुजबळ तसाच विचार करू शकतील.

असे झाल्यास राजकीय जुळवाजुळवीत नुकतेच एकत्र आलेले व बाजार समितीच्या निवडणुकीत महत्वाचे योगदान देणारे माजी सभापती संभाजीराजे पवार यांच्या वहिनी सविता पवार यांना संधी देऊन भविष्यातील राजकीय समीकरणे सुलभ करण्याला भुजबळ प्राधान्य देतील, असा अंदाज आहे. ज्येष्ठ नेते अंबादास बनकर यांचे पुत्र व जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर हेदेखील या पदाचे दावेदार आहेत.

आगामी जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकांतही बनकर परिवारातून सदस्य इच्छुक आहेत. किंबहुना प्रवीण बनकर थेट नगराध्यक्षपदाचेही उमेदवार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या तरी राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या गोटातून पवारांना प्राधान्यक्रम मिळेल अशीही चर्चा आहे. असे झाल्यास मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेलादेखील संधी देऊन बेरजेचे राजकारण साध्य होणार असल्याचे जाणकार सांगतात.

दुसरी शक्यता म्हणजे राष्ट्रवादीला सभापतीपद स्वतःकडे ठेवायचे असल्यास संजय बनकरांसह राष्ट्रवादीचे मतदारसंघाचे अध्यक्ष वसंत पवार यांचीही नावे पुढे येऊ शकतील. तसेच, उपसभापती पदासाठीदेखील वसंत पवार, संजय पगार, अल्केश कासलीवाल, संध्या पगारे, किसन धनगे यांची नावे राजकीय जुळवाजुळवीत पुढे येऊ शकतील, असा अंदाज आहे. अर्थात सध्या तरी अंदाजच असून, भुजबळ काय भूमिका घेतात यावर सर्व काही अवलंबून आहे. भुजबळांचे निकटवर्तीय दिलीप खैरे यांचीदेखील भूमिका या प्रक्रियेत महत्त्वाची ठरणार आहे.

-----=====================

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: डाळी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास नाफेड मार्फत भारत सरकार ते खरेदी करणार-अमित शाह

आम्ही सगळे थोडे घाबरलोय कारण... वहिनी कतरिना कैफच्या प्रेग्नन्सीबद्दल काय म्हणाला विकी कौशलचा भाऊ सानी कौशल?

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Solapur News: सोलापुरात पूर ओसरल्यानंतरही डेंगी-टायफॉईडचा प्रादुर्भाव; मनपाकडून घरोघरी तपासणी सुरू

SCROLL FOR NEXT