नाशिक

कवाड पुस्तक प्रकाशन

CD
NSK26H35121 नाशिक ः सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘कवाड’ पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी विजयकुमार मिठे, सप्तर्षी माळी, भीमाबाई जोंधळे, शेफाली भुजबळ व इतर ------------- ३०- सावित्रीबाईंच्या आयुष्याचा ‘कवाड’मधून परिपूर्ण वेध मिठे ः मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.१५ : सावित्रीबाईंच्या जीवनातील अनेक संदर्भ मांडणारी आणि त्यांच्या खडतर जीवनप्रवासावर ''कवाड'' ही परिपूर्ण कादंबरी आहे. सावित्रीबाईंच्या आयुष्याचा वेध घेणाऱ्या या कादंबरीने मराठी साहित्यात मोलाची भर टाकली असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक विजकुमार मिठे यांनी केले. ------------- लेखक सप्तर्षी माळी यांच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘कवाड’ कादंबरीचा प्रकाशन सोहळा झाला. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मु. शं. औरंगाबादकर सभागृहात रविवारी (ता.१५) कार्यक्रम झाला. भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका डॉ. शेफाली भुजबळ, पुस्तकांचे हॉटेलच्या संचालिका भीमाबाई जोंधळे, डॉ. अश्विनी बोरस्ते, डॉ. जयश्री वाघ, अक्षरबंध प्रकाशनाचे प्रकाशक प्रवीण जोंधळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते ग्रंथपूजन व वृक्षपूजन करण्यात आले. प्रत्येकाने पुस्तक वाचावे, ज्ञानाकडे जगाने वळावे म्हणून ''पुस्तकांचं हॉटेल'' सुरू केले. सावित्रीबाई यांच्या कार्याने आम्ही घडलो असल्याचे मनोगत भीमाबाई जोंधळे यांनी व्यक्त केले. डॉ. भुजबळ म्हणाल्या, ''कवाड'' म्हणजे आधुनिक विचारांचा, नव्या संस्कृतीचा दरवाजा उघडणे. घरातूनच महिलांना उभारी मिळणे, आपले पंख विस्तारण्यासाठी संधी मिळणे, हाच खरा सावित्रीबाईंच्या विचारांचा खरा सन्मान आहे. लेखक सप्तर्षी माळी यांनी पुस्तक लेखनाचा प्रवास उलगडून सांगितला. रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले. साई बागडे यांनी आभार मानले. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विदर्भात थंडीचा कडाका वाढला! तापमानात ५ अंशांची घसरण, पारा थेट १३ अंशांवर; नागपूरसह अनेक जिल्ह्यांत हुडहुडी

एसटी चालक-वाहकाचा मनमानी कारभार! विद्यार्थिनींना रात्री अंधारात अर्ध्या रस्त्यात उतरविलं, सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! ICC कडून २०३५ पर्यंतचं वेळापत्रक जाहीर; भारतात कधी होणार वर्ल्ड कप?

राज्यातील ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर जाणार! मंगळवारपासून कामकाज ठप्प होणार? नेमक्या मागण्या काय?

वंदे भारत ट्रेनचे ब्रेक फेल, तरी ४६३ किमी धावली; रेल्वेच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT