model of SPPU Sub center esakal
नाशिक

नाशिक : नाशिक उपकेंद्र इमारतीचे काम 2 टप्‍यांत होणार पूर्ण

अरूण मलाणी

नाशिक : शिवनई (ता. दिंडोरी) येथील जागेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या उपकेंद्र (Savitribai Phule Pune University Sub center) उभारणीच्‍या कामाला अखेर मुहूर्त लागला आहे. या जागेत इमारत उभारणीचे काम दोन टप्‍यांमध्ये पूर्ण होणार आहे. इमारतीत प्रशासकीय दालन तसेच वर्ग खोल्‍यांचा समावेश असेल. खेळती हवा व तापमानाच्‍या अन्‍य घटकांची विशेष खबरदारी या इमारतीच्‍या रचना आखताना केलेली आहे. (Savitribai Phule Pune University Sub center Nashik News)

पुणे विद्यापीठाचा वाढता विस्‍तार लक्षात घेता नाशिक उपकेंद्राबाबत गेल्‍या अनेक वर्षांपासून मागणी होती. गेल्‍या २०१४ मध्ये शासनातर्फे ६३ एकर जमीन विद्यापीठ उपकेंद्र उभारणीसाठी हस्तांतरित करण्यात आली होती. त्‍यानंतर संरक्षण भिंतीचे भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटात पार पडला होता. परंतु पुढे इमारत उभारणीचे काम रेंगाळले होते. दरम्‍यानच्‍या काळात अतिक्रमणाचा प्रश्‍न गंभीर बनल्‍यानंतर थेट स्‍थानिक जिल्‍हा प्रशासनाला हस्‍तक्षेप करावा लागला होता. आता इमारतीच्‍या बांधकामाला सुरवात होणार आहे.

या इमारतीची रचना करताना स्‍थानिक वातावरणाचा अंदाज घेतलेला आहे. कोर्टयार्डसह कार्यालयीन कामकाजासाठी दालन येथे बांधले जातील. तसेच आगामी काळात उपकेंद्रात अभ्यासक्रम सुरु करण्याचे प्रस्‍तावित असल्‍याने येथे वर्ग खोल्‍यादेखील असणार आहे. इमारतीचा भव्‍य प्रवेशद्वार लक्षवेधी ठरणार आहे. भूमिपूजनानंतर इमारत उभारणीला सुरवात होणार असून दोन टप्‍यांमध्ये बांधकाम पूर्ण केले जाणार आहे.

हिरवळीतून पर्यावरणाचा संदेश

इमारत व सभोवतालच्‍या भागात वृक्ष लागवड केली जाणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपांच्या रोपट्यांचा समावेश असेल. या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जाईल.

"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या नाशिक उपकेंद्राच्‍या इमारतीची रचना करताना विविध बाबींचा विचार केलेला आहे. प्रवेशद्वाराची भव्‍यता व हवा खेळती राहील अशी सुविधा केलेली आहे. दोन टप्‍यांमध्ये बांधकाम केले जाईल." - संजय पाटील, वास्तुविशारद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT