Chowdhury and villagers, members of the school management, while showing the shoddy work of the school in Palasan. esakal
नाशिक

Nashik News : शाळा इमारतीचे काम पाडले बंद! यंदाही पडक्या इमारतीतच शिक्षण

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पळसन (ता. सुरगाणा) येथील शासकीय आश्रमशाळेच्या संगणक प्रयोगशाळेच्या इमारतीचे आदिवासी विकास विभागातर्फे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करीत शाळा व्यवस्थापन समितीसह ग्रामस्थांनी काम बंद पाडले. (School building work closed Education in abandoned building this year too Nashik News)

या इमारतीच्या कामासाठी वनबंधू कल्याण योजनेंतर्गत ४९ लाख ९८ हजार रुपये मंजूर आहेत. या इमारतीतचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या इमारतीत वापरण्यात येणाऱ्या वाळूऐवजी दगडांपासून तयार केलेली पावडर तसेच बांधकामात मोठ्या प्रमाणात दगडगोट्यांचा वापर होत असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सुभाष चौधरी यांच्याकडे करण्यात आली.

श्री. चौधरी यानी बांधकामाच्या ठिकाणी भेट दिली असता तेथे अतिशय निकृष्ट दर्जाचे बांधकाम आढळून आले. त्यांनी तत्काळ काम बंद पाडले. संबंधित बांधकामासाठी वापरण्यात येणारे साहित्यही जप्त केले.

या बांधकामात वाळूऐवजी दगडांपासून तयार केलेली पावडर वापरली जात आहे. या शासकीय आश्रमशाळेत परिसरातील सहाशेपेक्षा जास्त आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बांधकामावर परिसरातील नागरिकांचे लक्ष आहे.

हे बांधकाम सुरू असताना आदिवासी विकास विभागाचे व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान विभागाचे अधिकारी एकदाही फिरकले नाहीत. अधिकारी आणि ठेकेदार यांचे साटेलोटे असावे, म्हणूनच कामाच्या दर्जाकडे लक्ष दिले जात नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

निकृष्ट दर्जाचे काम बंद करून संबंधितांची चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी सुभाष चौधरी यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहन जोपळे, हेमराज धूम आदींनी केली आहे.

शासकीय आश्रमशाळा, पळसन येथे इमारतीचे बांधकाम

"सुरू असलेल्या बांधकामासाठी अत्यंत निकृष्ट दर्जाची वाळू (रेती) वापरली जात असून, तसेच बांधकामावर पाणी कमी प्रमाणात मारले जात आहे. नागरिकांनी माझ्याकडे तोंडी तक्रारी केल्या. त्या अनुषंगाने भेट दिली असता सत्यता जाणून घेण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी भेट दिली असता, त्यात तथ्य आढळल्याचे विभागामार्फत व क्वालिटी विभागामार्फत तपासणी करून अहवाल आल्यानंतर ठेकेदार व अधिकाऱ्यांवर पुढील कारवाई करण्यात यावी."

- सुभाष चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT