School holidays from May 2 New academic year from 13th June Nashik News esakal
नाशिक

शाळांना सुटी 2 मेपासून; नवीन शैक्षणिक वर्ष 13 जूनपासून

खंडू मोरे

खामखेडा (जि. नाशिक) : शैक्षणिक वर्ष २०२१- २०२२ ची उन्हाळी सुटी २ मे पासून, तसेच नव्या शैक्षणिक वर्षातील शाळा १३ जूनपासून सुरू केल्या जाव्यात, असा शासन निर्णय शिक्षण विभागाकडून (Department of Education) जारी करण्यात आला आहे. तसेच, जून महिन्यातील विदर्भातील तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुटीनंतर तेथील शाळा या २७ जूनपासून सुरू करता येणार आहेत.

शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार राज्यातील शाळांच्या सुटीचा कालावधी २ मेपासून ग्राह्य धरण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२२- २०२३ मध्ये शाळा जूनच्या दुसऱ्या सोमवारपासून, तर विदर्भामध्ये जूनच्या चौथ्या सोमवारपासून सुरू होतील, असे निर्णयात म्हटले आहे. उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुटी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव किंवा नाताळसारख्या सणांच्या सुट्यांचे नियोजन शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीने करावे.

मात्र, माध्यमिक शाळा संहिता नियमानुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी, असेही शिक्षण विभागाच्या शासन निर्णयात स्पष्ट केले आहे. संपूर्ण राज्यातील शाळांच्या उन्हाळी सुटी आणि शैक्षणिक वर्ष सुरु करण्याच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी शिक्षण विभागाने हा निर्णय जाहीर केल्याचे पुण्याचे उपसंचालक विकास गरड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मिसिंग लिंक बनला टुरिस्ट स्पॉट! फोटो काढण्यासाठी गाड्यांच्या लांबच लांब रांगा, व्हिडिओ व्हायरल; MSRDC चा प्रवाशांना इशारा

HSC Result: मुंबईतील १० शाळांचा निकाल शून्य टक्के, सर्व विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत नापास

Satara Crime: साताऱ्यात धक्कादायक प्रकार उघड; कॅफेमध्ये अल्पवयीनांसाठी ‘खास रूम’चा पर्दाफाश, कॅफे आडून गैरप्रकार!

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणात पोलिसांची कारवाई; आरोपी भीमराव कांबळेच्या घरावर नोटीस

Pimpri Crime News: पिंपरीत बेकायदा गॅस रिफिलिंगचा स्फोटक धोका कायम; पोलिस कारवाईनंतरही ‘काळाबाजार’ सुरूच, जादा नफ्यासाठी जीवघेणा खेळ!

SCROLL FOR NEXT