School Nutrition Scheme News esakal
नाशिक

Nashik News : शालेय पोषण आहाराचा वाद विधिमंडळात! तारांकित प्रश्नावर आज चर्चा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शालेय पोषण आहार पुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने ३५ संस्थांना काम देण्यात आले. मात्र यातील तेरा संस्थांचे आठ ठेकेदार हे वादग्रस्त असल्याने त्यांना पात्र कसे केले, असा सवाल कळवणचे आमदार नितीन पवार यांनी अधिवेशनात तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. त्यावर आज चर्चा होणार आहे. (School nutrition controversy in legislature Discuss starred question today Nashik News)

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने १२ नोव्हेंबरला ३५ मक्तेदारांना शालेय पोषण आहार पुरविण्यासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आले. पहिली ते आठवीपर्यंतच्या एकूण एक लाख १८ हजार विद्यार्थ्यांना ३५ मक्तेदार आहार पुरवठा करणार आहे. ३५ संस्था व बचतगटांपैकी २४ बचतगटांकडे प्रत्येकी २००० विद्यार्थ्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, तर दहा हजार विद्यार्थ्यांच्या प्रत्येकी दोन गटांना पोषण आहार पुरवठा करण्याकरिता एकही संस्था पात्र न ठरल्याने दोनऐवजी दहा बचतगटांसाठी नव्याने निविदा राबविली जात आहे.

कोरोनापूर्वी महापालिकेने निविदाप्रक्रिया राबवून १३ ठेकेदारांना आहार पुरवठा करण्याचे काम दिले होते. परंतु कामात अनियमित आढळल्याने ठेके रद्द करत नव्याने स्वारस्य अधिकार मागविण्यात आले. या विरोधात वादग्रस्त १३ ठेकेदारांनी न्यायालयात देखील धाव घेतली होती. न्यायालयाने वादग्रस्त ठरविण्यात आलेल्या ठेकेदारांना निविदा प्रक्रियेत सहभागी करून घेण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार नवीन २७ व जुने आठ, असे ३५ मक्तेदार संस्था पात्र ठरविण्यात आल्या. परंतु यापूर्वी महापालिका प्रशासनानेच आधी अपात्र ठरविलेल्या आठ मक्तेदारांना पात्र कसे केले, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT