नाशिक

तीन विद्यार्थ्यांपासून १७० पर्यंत; जालिंदरनगर शाळेचा प्रेरणादायी कायापालट!

CD
पान-२ ॲंकर -------------- VNI26B13310 जालिंदरनगर (ता.खेड) ः येथील जिल्हा परिषद शाळेच्या अभ्यासदौऱ्याप्रसंगी दिंडोरी तालुक्यातील सहभागी शिक्षकांसह उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवाळ, आदिवासी विकास महामंडळ संचालक गोकूळ झिरवाळ. -------------- ३६-४ शिक्षकांनी जाणून घेतला जालिंदरनगरचा कायापालट ----------- दिंडोरीतून ५० शिक्षकांची भेट ः विद्यार्थ्यांनीच दिली शाळेच्या उपक्रमांसह प्रयोगांची माहिती ----------- सकाळ वृत्तसेवा वणी, ता.२३ : अवघ्या तीन विद्यार्थीसंख्या राहिल्याने शाळा बंद पडण्याची वेळ आली होती. मात्र सात महिन्यांत विद्यार्थीसंख्या थेट १७० वर गेली. जिद्द, सकारात्मक दृष्टिकोन आणि नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांच्या बळावर शाळेचे चित्र कसे बदलू शकते, याचा प्रेरणादायी अभ्यास करण्यासाठी जगातील सर्वोत्तम शाळा पुरस्कार आणि ''कम्युनिटी चॉईस अवॉर्ड'' पटकावणाऱ्या जालिंदरनगर (ता.खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा दिंडोरी तालुक्यातील सुमारे ५० शिक्षकांनी गुरुवारी (ता. २२) अभ्यासदौरा केला. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनीच मार्गदर्शकाची भूमिका बजावली, तर मान्यवरांनी जमिनीवर बसून त्यांच्याकडून शाळेतील उपक्रम समजून घेतले. या अभ्यासदौऱ्याचे आयोजन आदिवासी विकास महामंडळाचे संचालक व नाफेडचे सदस्य गोकूळ झिरवाळ यांनी केले. उपजिल्हाधिकारी तथा ना. नरहरी झिरवाळ यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हिरामण झिरवाळ, विस्तार अधिकारी परशराम महाले व अभिमन्यू बहिरम, केंद्रप्रमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि माजी विद्यार्थी संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. जालिंदरनगर शाळेचे शिक्षक दत्तात्रय वारे यांनी शाळेतील परिवर्तनाची प्रक्रिया, नियोजन आणि आनंददायी शिक्षणासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः गट तयार करून शिक्षकांना उपक्रमांची माहिती दिली. ------ कोट मोठ्या निधीपेक्षा सकारात्मक दृष्टिकोन, शिक्षकांची जिद्द आणि विद्यार्थ्यांप्रती बांधिलकी महत्त्वाची आहे. जालिंदरनगरचा प्रयोग ग्रामीण व आदिवासी भागातील शाळांसाठी प्रेरणादायी असून, येथील उपक्रम आपल्या शाळांमध्येही राबविण्यासाठी हा अभ्यासदौरा उपयुक्त ठरेल. - गोकूळ झिरवाळ, संचालक आदिवासी विकास महामंडळ. ------------- विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि उपक्रमांतील सहभाग पाहून आनंद झाला. कृतीतून शिक्षण दिल्यास विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळतो. या अनुभवातून प्रेरणा घेऊन आपल्या शाळेतही आनंददायी व विद्यार्थिकेंद्रित उपक्रम राबविणार आहोत - बबिता सूर्यवंशी, शिक्षिका, सागपाडा, ता. दिंडोरी ----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इलॉन मस्कला विसरा! इंजिनिअरिंगचं शिक्षण न घेता उत्तराखंडच्या तरुणानंही बनवली उडणारी कार; १३ वर्षांची मेहनत फळाला

Raj Thackeray: 'हा लोकशाहीचा खुन आणि बलात्कारच', व्हायरल ऑडिओ क्लिपवर राज ठाकरेंचा घणाघात; ट्विट करत म्हणाले...

Marathi News Live Updates: नाशिक-पेठ रस्त्यावर भीषण अपघात; टेम्पो आणि दुचाकीला आग, सुदैवाने जीवितहानी नाही

Pune News : रस्त्यावर फटाके फोडल्यास होणार कारवाई; पोलिसांची नियमावली जाहीर

ICICI Bank New Rules: ग्राहकांना मोठा झटका! 1 डिसेंबरपासून पैसे काढणं महागणार; EMI फेल झाल्यास दंड

SCROLL FOR NEXT