MLA Kishore Darade and officials participated in a meeting with Education Minister Deepak Kesarkar regarding various issues in the education department esakal
नाशिक

Nashik: शाळा अनुदान टप्प्यांसह शालार्थचे निकष शिथिल करणार! केसरकर यांचे आमदार दराडे यांच्या बैठकीत आश्वासन

सकाळ वृत्तसेवा

Nashik : २० टक्के, ४० टक्के टप्पा अनुदानासाठी पात्र शाळांची कागदपत्रांची पुनःपुन्हा होणारी पडताळणी टाळावी, शिक्षक भरती लवकरात लवकर करावी, तसेच मान्यताप्राप्त शिक्षकांच्या शालार्थसाठीच्या अटी शिथिल कराव्यात, अशी मागणी आमदार किशोर दराडे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत केली.

यावर टप्पा अनुदानासाठी कागदपत्रांची पडताळणी, शालार्थसाठीच्या अटीसह इतर निकष शिथिल करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. (Schools to relax tuition norms with grant phases Kesarkar assurance in meeting with MLA Darade Nashik)

राज्यातील पात्र- अपात्र शाळा, प्रलंबित संच मान्यता, शिक्षक भरती, आवक व जावक मिळत नसलेल्या शाळांचे टप्पा अनुदान देण्याबाबत व त्याचे निकष शिथिल करून शिक्षकांना दिलासा देण्यासाठी शिक्षणमंत्री केसरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

विधानभवन येथे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार दराडे यांनी शिक्षणमंत्री केसरकर यांच्या दालानत भेट घेऊन, शिक्षण, शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अनेक जुन्या शाळांमधील शिक्षक सेवानिवृत्त झाल्याने शिक्षकांची कमतरता असून, विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने शिक्षक भरतीला चालना द्यावी अशी मागणी दराडे यांनी केली. त्यावर लवकरच निर्णय घेऊन टप्प्याटप्प्याने ५० हजार शिक्षक भरती केली जाणार असल्याचेही आश्वासन केसरकर यांनी दिले

शालार्थ आयडीसाठी असलेले १२ निकषांपैकी सहा निकष पूर्ण केलेले असले तरी मान्यता देण्यात यावी, अशी मागणी दराडे यांनी केली. बैठकीस शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, शिक्षण सचिव रणजितसिंह देवल, समीर सावंत यांसह विभागातील अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

SCROLL FOR NEXT