नाशिक

सायटिका : वेदना फक्त कंबरेत नसते!

CD
सायटिका : वेदना फक्त कंबरेत नसते! कंबरदुखी सुरू झाली की अनेकदा ती साधी पाठदुखी समजून दुर्लक्ष केले जाते. मात्र, कंबरेपासून नितंब, मांडी, पोटरी किंवा पायापर्यंत जाणारी वेदना, मुंग्या, झिणझिण्या, जळजळ, पायात जडपणा किंवा चालताना होणारा त्रास ही लक्षणे सायटिकाची असू शकतात. त्यामुळे सतत किंवा वाढत जाणाऱ्या अशा वेदनांकडे दुर्लक्ष न करता त्यामागील कारण समजून घेणे आवश्यक आहे. - डॉ. नीरज गुजराथी सायाटिक नर्व्हवर दबाव किंवा जळजळ झाल्यास वेदना पायापर्यंत जाणवू शकतात. दीर्घकाळ एकाच स्थितीत बसणे, चुकीची बसण्याची पद्धत, अचानक वजन उचलणे, पाठ वाकवून काम करणे तसेच काही प्रकारच्या डिस्कच्या समस्यांमुळे हा त्रास उद्भवू शकतो. मात्र, प्रत्येक रुग्णामध्ये कारण आणि लक्षणांची तीव्रता वेगळी असू शकते. त्यामुळे केवळ वेदना कमी करण्याऐवजी वेदनांचे मूळ कारण शोधणे, योग्य मूल्यांकन करणे आणि व्यक्तीनुसार उपचारपद्धती ठरवणे महत्त्वाचे ठरते. रुग्णाची दैनंदिन जीवनशैली, पूर्वीचे वैद्यकीय अहवाल आणि सध्याची लक्षणे यांचा विचार करून उपचाराचे नियोजन केल्यास त्याचा अधिक परिणामकारकपणे पाठपुरावा करता येतो. लोटस ब्ल्यू आयुर्वेद ॲन्ड वेलनेस येथे ‘३० दिवसांचा सायटिका रोगमुक्ती कार्यक्रम’ अंतर्गत रुग्णाच्या तक्रारी, पूर्वीचे रिपोर्टस्‌, जीवनशैली आणि आवश्यक मूल्यांकन यांचा विचार करून वैयक्तिक आयुर्वेदिक उपचार योजना तसेच नियमित पाठपुरावा यावर भर दिला जातो. कंबरदुखी पायापर्यंत जात असेल, मुंग्या किंवा झिणझिण्या जाणवत असतील किंवा जास्त वेळ बसताना, चालताना त्रास होत असेल, तर वेदना वाढण्याची वाट न पाहता तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : 'कोणी मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही'; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही केलं भाष्य

Kannad Drought : दुष्काळाच्या झळा! दुष्काळामुळे शेतीतील रोजगार संपला; ऊसतोडीला जाणा-या मजुरांच्या संख्येत मोठी वाढ

CJP Jantar Mantar Protest: शनिवारी सीजेपीचं पुन्हा 'जंतरमंतर'! मुख्य प्रवक्ते सौरव दास दिल्ली पोलिसांच्या भेटीला, म्हणाले...

Latest Marathi News Live Update : रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा; हेन्री बी. कागन आणि केन्सो सोई यांचा सन्मान

Karnataka Elections : ग्रामपंचायत निवडणुकांपूर्वी जिल्हा-तालुका पंचायतींचा रणसंग्राम; जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका होण्याची शक्यता; डिसेंबरमध्ये प्रक्रिया सुरू?

SCROLL FOR NEXT