नाशिक

अवघड शस्त्रक्रिया यशस्वी

CD
धुळे : टुडे पान २ साठी... -- ‘एसीपीएम’मध्ये महिलेवर अवघड शस्त्रक्रिया यशस्वी -- सायटिका नर्व्हवरील गाठ काढण्यात वैद्यकीय पथकाला यश सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १ : येथील जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या मोराणे (ता. धुळे) येथील एसीपीएम वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात एका चाळीस वर्षीय महिला रुग्णावर अवघड आणि महत्त्वाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाचे कौतुक झाले. राजमाने (ता. मालेगाव) येथील ४० वर्षीय महिला काही महिन्यांपासून डाव्या पायाच्या तीव्र वेदना, मुंग्या येणे आणि पाय सुन्न होणे या त्रासाने त्रस्त होती. कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी एसीपीएम रुग्णालयात दाखल केले. येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी वैद्यकीय चाचण्या केल्यावर, शरीरातील मुख्य मज्जातंतू असलेल्या सायटिका नर्व्हवर स्वानोमा ट्युमर (गाठ) असल्याचे निष्पन्न झाले. डॉ. प्रणीत मानेकर आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने ही क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. या प्रक्रियेत डॉ. गिंदोदिया, भूलतज्ज्ञ डॉ. कुंवर आणि डॉ. कोल्हे यांनी सहकार्य केले. सध्या संबंधित महिला रुग्णाची प्रकृती पूर्णपणे ठणठणीत असून, तिच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असल्याने नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल जवाहर मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील, सचिव डॉ. ममता पाटील, अधिष्ठाता डॉ. नितीन कुलकर्णी यांनी सर्व वैद्यकीय पथकाचे कौतुक केले.

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा रक्तरंजित संघर्ष! दोन गटांत भीषण गोळीबार; पाच जणांचा मृत्यू, तणाव वाढणार?

IND vs NZ: ईशान किशनने सूर्यकुमारला टाकलं मागे अन् असा पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय

Drought Crisis: टंचाईच्या स्थितीतून बळीराजाला सावरण्याचा प्रयत्न ;शरद पवार यांचा दौरा सुरु

Latest Marathi News Update : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माढा तालुक्यात केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी, शेतकऱ्यांशी साधला संवाद

IND vs NZ ODI: टी-२० मालिकेनंतर टीम इंडिया पुन्हा सज्ज! पहिला वनडे सामना कधी, कुठे अन् किती वाजता? लाईव्ह सामना टीव्ही मोबाईलवर कुठे पाहता येणार?

SCROLL FOR NEXT