Nashik Drug Case esakal
नाशिक

Nashik Drug Case: त्र्यंबकमध्ये परदेशी विद्यार्थ्यांची कसून तपासणी; MD ड्रग्सच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोहीम

सकाळ वृत्तसेवा

Nashik Drug Case : नाशिकमध्ये सध्या एमडी ड्रग्जस्‌चा मोठ्याप्रमाणात सुळसुळाट झाला आहे. तसेच, शहरालगतच्या काही शिक्षण संस्थांमध्ये परदेशातून विद्यार्थी येत असल्याने त्यांच्यामार्फतही एमडी ड्रग्जसचे रॅकेट चालविले जात असल्याचे आरोप करण्यात आले हाेते.

त्यापार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी परदेशी विद्यार्थ्यांना लक्ष्य करीत त्यांची कसून झडती घेतानाच चौकशी सत्र राबविले. (Scrutiny of foreign students in Trimbakeshwar Police operation in wake of MD drugs nashik)

नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर मोठ्याप्रमाणात उच्च शैक्षणिक संस्‌था आहेत. या संस्‌थांमध्ये परदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी दाखल होत असतात. हे विद्यार्थी परिसरात अंमली पदार्थ बाळगत असल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला होता.

त्यावरून त्र्यंबकचे पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (ता. २१) महिराणी परिसरात राहणार्या परदेशी विद्यार्थ्यांची व त्यांच्या निवासस्थानाची कसून तपासणी करण्यता आली.

३५ परदेशी विद्यार्थी राहत असलेल्या घरांची झडतीही घेण्यात आली. त्यात काहीही आक्षेपार्ह आढळून आलेले नाही. त्याचप्रमाणे त्र्यंबकरोडवरील बहुतांशी हॉटेल्स, लॉजेसबाबत तक्रारी आल्या असता, त्यांचीही कसून तपासणी घेण्यात आली.

सदरची कारवाई ग्रामीण पोलीसांकडून सातत्याने केली जाणार आहे. परिसरात अवैध व्यवसायांबाबत नागरिकांनी नाशिक ग्रामीण पोलीसांची हेल्पलाईन ६२६२२५६३६३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

Investment: पोस्ट ऑफिसच्या 15-5-5 फॉर्म्युल्याने बना करोडपती! काय आहे ही गुंतवणूक योजना?

Shalarth ID Scam: शालार्थ आयडी घोटाळा ईडीकडे सोपवावा; शिक्षक परिषदेची मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

Lucky Zodiac Signs: “वयाच्या ३० नंतर अचानक बदलतं ‘या’ ५ राशींच्या लोकांचं नशीब; पैसा, करिअर आणि सुख-समृद्धीमध्ये होते मोठी वाढ”

माधुरी दीक्षितने 'कोण होणार करोडपती' होस्ट करायला होकार का दिला? स्वतः सांगितलं खरं कारण; म्हणते- मराठीत...

SCROLL FOR NEXT