नाशिक

शरणपूर रोड येथील असोसिएट कार्यालयास आग लागून नुकसान

CD
फोटो : A15194 नाशिक : असोसिएट कार्यालयास लागलेल्या आगीत झालेले नुकसान. -- शरणपूर रोडवरील कार्यालयात मध्यरात्री आग अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ५० लाखांची मालमत्ता बचावली सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक, ता. ८ : शरणपूर रोड राजीव गांधी भवनासमोरील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एसडी असोसिएट यांच्या कार्यालयाला आग लागल्याची घटना शनिवारी (ता. ८) रात्री घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. जवानांच्या तत्परतेमुळे शेजारील कार्यालये तसेच तळमजल्यावरील दुकाने आणि कार्यालयांचे मोठे नुकसान टळले. कारवाईत सुमारे ५० लाख रुपयांची मालमत्ता वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले. इमारतीचा सुरक्षारक्षक पंकज धुमाळ यांनी आग लागल्याची माहिती अग्निशमन दलास दिली. अग्निशमन मुख्यालयातील लीडिंग फायरमन सोमनाथ थोरात, उदय शिर्के, एमपी म्हस्के मल्टीपर्पज अग्निशमन बंबाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दुसऱ्या मजल्यावरील संबंधित कार्यालयातून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडत होता. जवानांनी सूचनांसाठी आवश्यक सुरक्षा उपकरणांचा वापर करून कार्यालयात प्रवेश केला. कार्यालयातील खिडक्या उघडून धूर बाहेर काढण्यात आला. दिवा पेटविल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. आगीने कार्यालयातील पडदे, सोफा सेट, टीव्ही, एअर कंडिशनर तसेच अन्य फर्निचरला आपल्या कवेत घेतले होते. अग्निशमन जवानांनी पाण्याचा मारा करून अवघ्या काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळविले. वेळीच केलेल्या कारवाईमुळे आग शेजारील कार्यालयांमध्ये पसरण्यापासून रोखण्यात मिळाले. आगीत ५ लाखांचे नुकसान झाले असून, सुमारे ५० लाख रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश आले. अग्निशमन विभाग वेळेत घटनास्थळी धडकल्याने मोठी दुर्घटना टळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Murud Accident: मुरुडवर शोककळा! भरधाव कारची स्कूटरला जोरदार धडक; शिक्षक आणि प्रसिद्ध गणेशमूर्तिकार तानाजी कुंभार यांचा जागीच मृत्यू

Emotional Post by Saira Banu : "दिवाळीच्या प्रकाशात एक वेगळीच जादू असते, आमची फोटो काढण्याची होती परंपरा"; पाली हिलच्या बंगल्यातील जुन्या आठवणींना उजाळा देत चाहत्यांचेही पाणावले डोळे

Ratnagiri MIDC Water Storage 2026 : उद्योगांची पाण्याची चिंता आता मिटणार! 'या' पाच धरणांत मे-जूनपर्यंत पुरेल एवढा मुबलक साठा; MIDC कडून पाण्याचे चोख नियोजन

Latest Marathi News Live Update: : शरद पवारांच्या भेटीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या 'सिल्वर ओक'वर जाणार; रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भेटीची मालिका सुरू

अय्यो, किती गोड! विकी-कतरिनाचाने शेअर केला मुलगा विहानचा पहिला फोटो, लेक दिसतो सेम टू सेम बाबासारखा

SCROLL FOR NEXT