Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : देवळाली गावातील राड्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल; परस्परविरोधी फिर्याद

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : देवळाली गावात शिवजन्मोत्सव समितीच्या बैठकीत शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे गटात झालेल्या राड्यावेळी केलेल्या गोळीबार व दंगलप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. लवटे यांच्या फिर्यादीनुसार मणियार यांनी गोळीबार केल्याचा दावा केला असून, त्यानुसार दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, मणियार यांनी गोळीबार केल्याच्या गुन्ह्याचा तपास मुंबई नाका पोलिस ठाण्याचे गुन्हेशोध पथकाचे पोलिस निरीक्षक करणार आहेत. (Second case filed in Devalali firing case Conflicting complaints Nashik Crime News)

देवळाली गावातील दोन गटातील राडा व गोळीबारप्रकरणी पहिल्या दाखल गुन्ह्यात संशयित स्वप्नील लवटे यास पोलिसांनी अटक केली आहे. तर, सूर्यकांत लवटे यांच्या दुसऱ्या गटाविरोधात फिर्यादीनुसार, उपनगर पोलिसांत माजी नगरसेवक अस्लम ऊर्फ भय्या मणियार, प्रशांत जाधव, सागर कोकणे या संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

देवळाली गावातील सर्वपक्षीय शिवजन्मोत्सव समितीची बैठक सुरु असताना शिवसेना शिंदे गटाचे लवटे बंधू आणि ठाकरे गटातील अस्लम मणियार यांच्यात वाद झाला होता. दोन्ही गटात वाद होऊन शिवीगाळ व धक्काबुक्की होताच तलवार, कोयते, लाठ्याकाठ्या आणलेल्या संशयित मणियार यांच्या गटाने हल्ला केल्याचा दावा माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांनी फिर्यादीत केला आहे. त्यानुसार संशयित मणियार, जाधव, कोकणेसह ८० ते १०० जणांविरोधाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

दरम्यान, गेल्या गुरुवारी (ता.१९) झालेल्या राडा व गोळीबारप्रकरणी ठाकरे गटातील सागर कोकणे यांच्या फिर्यादीवरून स्वप्नील लवटे याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित लवटेला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडील पिस्तूलही हस्तगत केली आहे.

तटस्थ तपासही होणार

सदर घटनेप्रसंगी दोन्ही गटांकडून गोळीबार करण्यात आला होता का, दोन्ही गटांकडून करण्यात आलेल्या आरोपात तथ्य आहे का, यासह प्रत्यक्षदर्शींच्या जबाबानुसार उपनगर पोलिस तपास करीत असल्याची माहिती परिमंडळ दोनचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिली.

तर, सदरील गुन्ह्याचा तटस्थपणे तपास होण्यासाठी मणियार यांच्याविरोधातील गुन्ह्याचा तपास मुंबई नाका पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे निरीक्षक चंद्रकांत आहिरे यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT