corona 123.jpg 
नाशिक

VIDEO : Breaking : नाशिकमध्ये दुसरा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह...जिल्हाधिकारीं कडून माहिती

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोनाच्या संकटाच्या चिंतेने संपूर्ण देशात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली असतानाच नाशिककरांसाठी आणखी एक चिंतेची बातमी आहे. कारण नाशिकमध्ये आता दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. संबंधित संशयिताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल  जिल्हा रुग्णालयात प्राप्त झाला असुन तो कोरोना विषाणु बाधित असल्याचा निष्कर्ष अहवालात आलेला आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे.

नागरीकांनी घाबरुन जावु नये, घराबाहेर पडु नये,

दरम्यान  जिल्हयातील प्रथम कोरोना बाधित निफाड तालुक्यातील ३० वर्षांच्या तरुणाला कोरोनाची लागण झाली . धक्कादायक बाब म्हणजे हा तरुण परदेशातून आलेला नसून तो एका दुकानामध्ये कामाला होता. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या संनियंत्रणानुसार कोरोना विषाणु पॉझीटीव्ह रुग्णाच्या घराच्या परिसरातील घरातील व्यक्तींचे साथरोग सर्वेक्षण  पथकामार्फत सुरु करण्यात आले आहे. तसेच या सर्व परिस्थितीवर  विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सेवेतील  डॉक्टर, कर्मचारी कारोना साथीच्या नियंत्रणासाठी लक्ष ठेवून आहेत. नागरीकांनी घाबरुन जावु नये, घराबाहेर पडु नये, हात वारंवार साबणाने  स्वच्छ धुवावे आपले हात नाक,तोंड,डोळे यांना लावण्याचे टाळा, असे आवाहन प्रशासनाने केले आहेत", 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water Supply: पुण्यातील सात गावांच्या पाणीप्रश्नांना दिलासा; केंद्राकडून ७१० कोटींचा निधी, वाघोली, मांजरी, बावधनसह सात गावांतील पाणीप्रश्न सुटणार!

Indian Economy News: महागाईचा चटका! पेट्रोल, डिझेलपासून अन्नपदार्थही महागले; महागाईचा उच्चांक, रुपया नीचांकी पातळीवर

Maharashtra Latest News Live : लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात

पुणे-बंगळूर अंतर ९३ किमीने कमी होणार, ५-६ तास वेळ वाचेल; ८ पदरी ग्रीनफिल्ड कॉरिडॉरच्या कामाला मुहूर्त मिळाला

‘ऋषी कपूर यांच्यासोबत रोमँटिक गाणं करताना मी घाबरले होते’; पद्मिनी कोल्हापुरेंनी खुलासा करत सांगितला खास किस्सा

SCROLL FOR NEXT