khamkheda jawan esakal
नाशिक

खामखेडातील जवानाला दक्षिण अफ्रिकेत संधी!शांतिसेनेसाठी निवड

खंडू मोरे

खामखेडा (जि.नाशिक) : येथील संदीप वाघ या जवानाची दक्षिण अफ्रिकेत शांततेसाठी कार्य करत असलेल्या सैन्य दलाच्या शांतिसेनेसाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल खामखेडा गाव व परिसरात आनंद व्यक्त केला जात आहे. (Selection-for-Shantisena-Opportunity-in-South-Africa)

दक्षिण अफ्रिकेत संधी; सर्वत्र कौतुक

खामखेडा येथील संदीप खंडू वाघ १९९९ मध्ये भारतीय सैन्यात भरती झाले. बेळगाव कर्नाटक येथे सैनिकपूर्व प्रशिक्षणात उत्तम प्रशिक्षण घेत त्यांनी आपली छाप पाडली होती. त्यांची नियुक्ती मराठा लाइफ इन्फंट्री रेजिमेंटमध्ये करण्यात आली. या बटालियनअंतर्गत सर्वप्रथम अंदमान निकोबार येथे ते सेवा बजावू लागले. त्यांतर जम्मू-काश्मीर येथील लेह, लडाख, दिल्ली, जम्मू-काश्मीरमधील उरी, त्यानंतर गुजरातमधील गांधीनगर, अरुणाचल प्रदेशातील तवांग, पंजाब येथील फिरोजपूर व सध्या अरुणाचल प्रदेशमध्ये चीनच्या सीमेवर त्यांची नेमणूक आहे. येथे कार्यरत असतानाच त्यांची भारतीय सेनेतर्फे दक्षिण आफ्रिकेतील शांतिसेनेसाठी निवड झाली आहे. आजपर्यंत त्यांनी २२ वर्षे सेवा बजावली आहे.

तालुक्यातून पहिला सैनिक शांतिसेनेत

दक्षिण आफ्रिका येथील डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो या ठिकाणी सध्या या सेनेचे वास्तव्य आहे. लष्करातील निवडक सैनिकांना येथे जाण्याची संधी मिळते. अविरतपणे भारतीय सेनेची सेवा करणाऱ्या व आउटस्टॅंडिंग प्रदर्शन करणाऱ्या सैनिकांना शांतिसेनेत निवड होते. तालुक्यातून पहिला सैनिक शांतिसेनेत जाण्याचा मान संदीप वाघ यांना मिळाला आहे. महिन्याभरापूर्वी ते या ठिकाणी पोचले आहेत.

निवडीबद्दल अभिनंदन

आमदार डॉ. राहुल आहेर, माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष लोटन शेवाळे, खामखेडाचे सरपंच संजय मोरे, माजी सैनिक जयराम शेवाळे, महारू आहेर, संजय शेवाळे, शिवाजी शेवाळे, पंडित देवरे, बाळासाहेब आहेर, माजी सरपंच आण्णा पाटील, नानाजी मोरे, दादाजी बोरसे, वडील खंडू वाघ, बापू वाघ, काशिनाथ वाघ, भास्कर वाघ, बाळू वाघ, संजय मोरे, जगदीश सोनवणे, पांडू मोरे, रवींद्र शिंदे, उषा वाघ, वर्षा वाघ, नीता जाधव, आजी-माजी सैनिकांनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये सत्तासंघर्षाला नवं वळण! व्हीप न मानल्यास अपात्रतेची कारवाई, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपचा इशारा

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

Latest Marathi News Live Update : परभणीत ५ एकरातला ऊस जळून खाक

Uddahv Thackeray : ‘भाजपकडून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रदूषण’

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० बिलियन डॉलर्सची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

SCROLL FOR NEXT