Kasbe Sukene: Keshav Tungar, Devram Mogul, Raibhan Davange etc. felicitated Vignesh Tidke who qualified in state level weightlifting sports. esakal
नाशिक

Nashik News : 102 किलो वजनाच्या विघ्नेशची राज्यस्तरीय Weightlifting स्पर्धेसाठी निवड

सकाळ वृत्तसेवा

कसबे सुकेणे : मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात इयत्ता दहावीत शिकत असलेल्या १०२ किलो वजनाच्या विघ्नेश तिडके यांची राज्यस्तरीय भारत्तोलन (वेटलिफ्टिंग) स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हा, विभागीय स्तरावर त्याने प्रथम क्रमांक मिळविल्याने त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

६ फूट २ इंच उंचीच्या विघ्नेश याचे वजन आणि उंची पाहून त्याची क्रीडा क्षेत्रातील आवड लक्षात घेऊन विद्यालयाचे प्राचार्य रायभान दवंगे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक दिलीप काळे,अनिल उगले व आकाश आहेर यांनी त्याला गोळा फेक, हातोडा फेक व वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात मार्गदर्शन केले. (Selection of 102 kg Vignesh for State Level Weightlifting Competition Nashik Sports News)

धिप्पाड शरीरयष्टी असतानाही विघ्नेश याचे वजन उचलण्याचे लकब अफलातून असून पहिल्याच प्रयत्नात तो अपेक्षित वजन उचलून यशस्वी होण्याचा प्रयत्न करतो. तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत त्याच्यासमोर स्पर्धकच न आल्याने त्याला बाय मिळाला होता.

त्यानंतर जिल्हास्तरावर देखील आपल्या प्रतिस्पर्ध्याला मात देत विभागावर धडक मारली. त्यानंतर विभागातही त्याने प्रथम क्रमांक प्राप्त करत राज्यस्तरावरील वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी तो पात्र ठरला आहे. खेळाप्रमाणे विघ्नेश अभ्यासातही हुशार आहे.

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तो पात्र ठरल्याने त्याचे गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार व मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे उपसभापती देवराम मोगल अभिनंदन केले. या यशाबद्दल प्राचार्य रायभान दवंगे ,उपप्राचार्य शिवाजी कोटकर ,क्रीडा शिक्षक दिलीप काळे,अनिल उगले व आकाश आहेर यांनी विघ्नेशचे अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा : असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोनं 19 हजार तर चांदी 98 हजारांनी स्वस्त! पाहा तुमच्या शहरातील आजचा भाव

Pakistan Cricket : पाकिस्तानचा गोंधळ! T20 World Cup बद्दल केलेला मेसेज डिलिट... आता यांचा काय नवीन ड्रामा? चाहते संतापले

Latest Marathi News Live Update : सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीला

Sanjay Raut statement : सुनेत्रा पवार यांच्या शपविधीवर संजय राऊत म्हणाले, 'शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य योग्यच'

Budget 2026 : 1973 सालच्या बजेटला 'ब्लॅक बजेट' का म्हटलं जात? देशावर नेमकं काय संकट आलं होतं?

SCROLL FOR NEXT