Customers enjoying tea along the highway.
Customers enjoying tea along the highway. esakal
नाशिक

Nashik News: चहा, नाश्‍त्यातून मिळविला स्वयंरोजगार! महामार्गालगत तरूणांनी थाटलं हॉटेल

दीपक देशमुख

झोडगे : एकीकडे शिकलेल्या तरुणांचा जत्था तर दुसरीकडे कमी झालेल्या नोकऱ्यांमुळे तरुण दिशाहीन आणि नाउमेद होत असताना झोडगेसह परिसरातील तरूणांनी त्याला छेद देत स्वयंरोजगाराचे साधन शोधले आहे.

तसं म्हटले तर चहाची टपरी टाकणे आणि नाश्त्याची हॉटेल टाकणे हे कमीपणाचे मानले जात होते, पण तरूणांनी त्याला छेद देत या छोट्याशा व्यवसायालाच स्वयंरोजगाराचे साधन बनविले आहे.

येथे महामार्गासमोर तरूणांनी ही छोटेखानी हॉटेल सुरू केले असून त्यातून हक्काचा दिवसाकाठी किमान एक हजार रुपयांचा रोजगार सहज मिळत आहे. बेरोजगारांसाठी दिशा देणारा हा प्रेरणादायी प्रकल्पातूनच पुढे मोठा व्यावसायिक होण्याची उमेद ते बाळगून आहेत. (Self employment gained from tea breakfast hotel built by youth along highway at zodge Nashik News)

झोडगे गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर वसलेले असून रात्रंदिवस मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असल्याने महामार्गावरील प्रवाशांची गरज पाहता चहा, नाश्ता व भोजनासह विविध खाद्यपदार्थाला मोठी मागणी असल्याने अनेक बेरोजगार तरुणांनी या व्यवसायात स्टार्टअप सुरू केलेले दिसते.

राष्ट्रीय महामार्गालगत चहा व नाश्त्याचे छोटेखानी हॉटेलवजा दुकान सुरू करणे हे तसे मोठे जिद्दीचे आणि संयमाचे काम आहे. कारण इथे स्वतः राबलो तरच ठिक, अन्यथा दुसऱ्यांवर विसंबून राहिलात तर नफातोटयाचे गणित बिघडते.

त्यामुळे या व्यवसायात बेरोजगार तरुणांनी झोकून देत रोजगाराची संधी उपलब्ध करून घेतली आहे. थंडीच्या दिवसात चहा व गरम नाश्त्याची ग्राहकांची मागणी वाढते, त्यामुळे सध्या तर भल्या पहाटेपासून उठावे लागत आहे, तेव्हा कुठे सकाळी सहाला महामार्गावरून जाणाऱ्यांना वाफाळलेला चहा देता येतो असे ही तरुण सांगतात.

मुंबई आग्रा महामार्गावर झोडगे बसस्थानक व कांदा मार्केटजवळ अनेक चहा विक्रेत्यांनी चहा व नाश्ताची छोटेखानी हॉटेल सुरू केली आहेत. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळण्यासाठी अनेक अडचणी येतात.

शेती व्यवसाय निसर्गाच्या लहरीपणामुळे बेभरवशाचा झाल्याने हाताला काम नाही. अशा वेळी उदरनिर्वाहासाठी रोजगाराची वाट महामार्गावरून सुरू केल्यास बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल या भावनेतून लहान मोठे व्यवसाय सुरू करून तरूणांनी एक आदर्श निर्माण केला आहे.

गुणवत्तापूर्ण गुळाचा चवदार कडक चहा प्यायला महामार्गावरील प्रवाशांची येथे मोठी गर्दी दिसून येते. रस्त्याच्या कडेला वाहने उभे करून चहाचा घोट घेत प्रवासा दरम्यानच्या शीण घालवत चहाप्रेमीची तलफ भागविताना येथील चहा व्यावसायिकाची लगबग दिसून येते.

खवय्येगिरीसाठी प्रसिद्ध असलेले झोडगे येथील हॉटेल व्यावसायिकांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. महामार्गालगत असणारे चहा व नाश्ताचे स्टॉल सामान्य ग्राहकांच्या खिशाला परवडणारे आहेत हे विशेष, त्यामुळेच ग्राहकांची मोठी वर्दळ दिसून येते.

"गुणवत्तापूर्ण चहा नाश्ता ग्राहकांना दिला जात असल्याने महामार्गावरून प्रवास करणारे वाहनचालक, प्रवासी चहा व नाश्तासाठी आता नियमित थांबतात. ग्राहकांचे समाधान हाच आमचा नफा हे ब्रीद घेऊन आम्ही व्यवसाय करत असल्याने उत्तमरीत्या व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे रोजगार उपलब्ध झाल्याने भविष्यात अधिक जोमाने या क्षेत्रात करण्याची ऊर्मीही मिळाली आहे."- सचिन कदम, सोपान शेळके, चहा व नाश्ता व्यावसायिक, झोडगे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT