amphotericin-b e-sakal
नाशिक

सरकारी यंत्रणेकडूनच ॲम्फोटेरिसिन-बीची जादा दराने विक्री

औषधांवर निश्‍चित केलेल्या किमतीपेक्षा एक रुपया अधिक घेतला तरी खासगी औषध विक्री दुकानदारांवर कारवाई होते.

विक्रांत मते

नाशिक : औषधांवर निश्‍चित केलेल्या किमतीपेक्षा एक रुपया अधिक घेतला तरी खासगी औषध विक्री दुकानदारांवर कारवाई होते. परंतु सरकारी यंत्रणेकडूनच ‘ॲम्फोटेरिसिन बी’(amphotericin-b) इंजेक्शनची जादा दराने विक्री करण्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात रुग्णांच्या नातेवाइकांना पैसे परत करण्याची भूमिका जिल्हा रुग्णालयाकडून घेण्यात आल्याने नातेवाइकांचा रोष थंडावला. (Selling amphotericin-B at extra rates from government agencies)

सरकारी यंत्रणाच सूचना पाळत नाही

कोरोनाबाधित रुग्ण(Corona patients) उपचाराअंती बरा झाल्यानंतर आता म्युकरमायकोसिस(Mucormycosis) आजाराला सामोरे जावे लागत आहे. उपचारासाठी ॲम्फोटेरिसिन बी(amphotericin b) इंजेक्शनची आवश्यकता भासते. इंजेक्शनची किंमत अधिक असल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. रेमडेसिव्हिर(Remdesivir) इंजेक्शनप्रमाणे काळा बाजार होण्याची शक्यता असल्याने राज्य शासनाने खासगी मेडिकलमध्ये इंजेक्शन विक्रीवर बंदी घातली आहे. सरकारी यंत्रणेमार्फतच इंजेक्शन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. १९ मेस जिल्हा रुग्णालयाला इंजेक्शन प्राप्त झाल्यानंतर अधिकतम छापील किमतीनुसार साधारण साडेसात हजार रुपयांना इंजेक्शन रुग्णांच्या नातेवाइकांना विकले गेले. २० मेस शासनाने इंजेक्शनची किंमत कमी करून साधारण साडेपाच हजार रुपयांना विक्री करण्याच्या सूचना दिल्या. मात्र जिल्हा रुग्णालयाकडून छापील किमतीनुसारच सुमारे साडेसात हजार रुपयांना इंजेक्शनची विक्री करण्यात आली. यामुळे औषधे खरेदी करण्यासाठी रांगेत उभ्या नागरिकांना नव्या त्रासाला सामोरे लागले. खासगी मेडिकलमध्ये छापील किमतीपेक्षा एक रुपया अधिक घेतला तरी कारवाई होते. मात्र जिल्हा रुग्णालयाकडून अधिक रक्कम आकारण्यात आल्याचा प्रकार समोर आला.

''ॲम्फोटेरिसिन बी इंजेक्शनसाठी रोख स्वरूपात रक्कम घेतली जात नाही. जेवढे इंजेक्शन लागतील त्या रकमेचा डिमांड ड्राफ्ट(DD) स्वीकारला जातो. शासनाकडून किंमत कमी होऊन आली, ही बाब खरी असली तरी नवीन डिमांड ड्राफ्ट काढणे यात विलंब होणार असल्याने आहे त्या किमतीचे डीडी स्वीकारले. रुग्णालयाकडे रकमेचा फरक पुन्हा वर्ग केला जाणार आहे.''

-डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये पेट्रोल तब्बल 10 रुपये स्वस्त! तुमच्या शहरात आजचा दर किती?

Kagal Politics : हसन मुश्रीफ आणि घाटगे एकत्र कसे आले? CM फडणवीसांच्या कागल दौऱ्यापूर्वीच समरजितसिंह घाटगे यांनी स्पष्टच सांगितली पडद्यामागची कहाणी

Bhandardara Accident: भंडारदरा पर्यटनाला गालबोट! मद्यपींची हुल्लडबाजी, भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या पथकाने केलेल्या कामगिरीचा मला अभिमान वाटतो- पंतप्रधान मोदी

Buldhana Farmer Loan Waiver: बुलडाण्यात १.१६ लाख पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, ६७ हजार ई केवायसी प्रलंबित

SCROLL FOR NEXT