नाशिक

ज्येष्ठ नागरिकांनी उर्वरित आयुष्य सन्मानाने जगावे : रमेशचंद्र अग्रवाल

CD
फोटो : NSK26H31271 नंदुरबार : ज्येष्ठ नागरिक दरबारात बोलताना निवृत्त प्राचार्य बी. एस. पाटील. व्यासपीठावर रमेशचंद्र अग्रवाल, सुरेश अग्रवाल, सुलभा महिरे, आशा तिवारी, बारकू पाटील, सीमा खत्री, शारदा मराठे आदी. --------------------- ज्येष्ठ नागरिकांनी उर्वरित आयुष्य सन्मानाने जगावे : अग्रवाल नंदुरबार, ता. ४ : ज्येष्ठ नागरिकांनी आपले संपूर्ण आयुष्य कुटुंबासाठी व समाजासाठी समर्पित केले आहे. उर्वरित आयुष्य त्यांनी स्वतःसाठी सन्मानाने जगावे. ज्येष्ठ नागरिकांच्या विविध उपक्रमांसाठी अग्रवाल समाज नेहमीच सहकार्य करेल, असे प्रतिपादन अग्रवाल समाजाचे अध्यक्ष रमेशचंद्र अग्रवाल यांनी केले. शहरातील अग्रवाल भवन येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, श्री. अग्रवाल समाज नंदुरबार आणि आई- वडील व ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ज्येष्ठ नागरिक दरबार’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी नऊ ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या कौटुंबिक व वैयक्तिक समस्या मांडून न्याय मिळवून देण्याची मागणी केली. पुसनद येथील श्री दत्त ज्येष्ठ नागरिक मंडळाने विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. महसूल विभाग, पोलिस प्रशासन, विधी सेवा प्राधिकरण आणि विधी महाविद्यालयाच्या प्रतिनिधींनी ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले. अग्रवाल समाजाचे अध्यक्ष सुरेश अग्रवाल म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांनी भावनेच्या आहारी जाऊन आपली सर्व संपत्ती वारसांना देण्याऐवजी स्वतःच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद करावी. तसेच, इच्छापत्र तयार करून द्यावे. ज्येष्ठ नागरिक दरबाराचा उपक्रम दर महिन्याला घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. संस्थापक अध्यक्ष बारकू नवल पाटील यांनी संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत २०० हून अधिक कुटुंबांना न्याय मिळवून दिल्याचे सांगितले. ॲड. सीमा खत्री यांनी ज्येष्ठ नागरिकांना शासनाकडून मोफत कायदेशीर मदत व मार्गदर्शन उपलब्ध असल्याचे सांगून अन्यायाविरोधात पुढे येण्याचे आवाहन केले. बी. एस. पाटील यांनी ज्येष्ठ नागरिक निर्वाह कायदा २००७ विषयी मार्गदर्शन केले. या वेळी रतनलाल अग्रवाल, सामाजिक कार्यकर्त्या सुलभा महिरे, पीएसआय तानाजी बहिरम, ॲड. शारदा मराठे, मदनलाल कावळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आत्माराम इंदवे यांनी प्रास्ताविक केले. गणपतराव पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डी. आर. पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "देश ज्ञानेश कुमारांच्या बापाचा आहे का?" उद्धव ठाकरे कडाडले; केंद्र सरकारवरही बोचरी टीका

Maharashtra MLC Election 2026 : भाजपची मोठी घोषणा! विधान परिषद निवडणुकीसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचे उमेदवार जाहीर; पाहा संपूर्ण यादी

Latest Marathi News Live Update : CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Masarul Dam Water: अवैध उपशामुळे धरणाच्या पाणीसाठ्यावर संकट;मासरूळ धरणातील उपशावर कारवाईची मागणी

Kikvi Project Deal : किकवी प्रकल्प व्यवहाराच्या कोणत्याही चौकशीस तयार माजी संचालकांचा खुलासा; करार पारदर्शी

SCROLL FOR NEXT