parvati aaji.jpg 
नाशिक

लय भारी आजी! ‘पॉझिटिव्ह’ कोरोनाला ठरवले ‘निगेटिव्ह’; नव्वदीपार आजीकडून कोरोना चीतपट 

योगेश बच्छाव

नाशिक / सोयगाव : संपूर्ण जगावर कोरोनाने आपला विळखा घातला आहे. त्यात अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. कोरोनाचा तरुण वर्गापेक्षा वयोवृद्धांना अधिक धोका असल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे. या महामारीत अनेक वयोवृद्ध दगावले, तर काही बरे होऊन घरी परतले. अशाच एका ९१ वर्षाच्या आजीने आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाला चीतपट करत त्या पुन्हा घरी परतल्या आहेत. 

नव्वदीपार आजीकडून कोरोना चीतपट 
मालेगावातील संगमेश्वर येथे राहणारे माजी उपमहापौर सखाराम घोडके यांच्या मोठ्या भगिनी पार्वताबाई नथू बिरारी १५ दिवसांनंतर कोरोनावर मात करीत सुखरूप घरी पोचल्या आहेत. असे म्हणतात, की इच्छाशक्ती असेल तर जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आजींच्या इच्छाशक्तीमुळे आजी घरी सुखरूप आल्या आहेत. आजींना कोरोना झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबीयांना धीर देत मला काहीही होणर नाही, मी सुखरूप घरी पोचेन असे सांगत आपल्या कुटुंबीयांना धीर दिला. योग्य उपचार व संयम दाखवत आजी १५ दिवसांच्या उपचारातून बऱ्या झाल्या. त्यांच्या घरी परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे आनंदाने स्वागत केले आहे. त्यांच्या या सकारात्मक विचाराने त्यांनी वयाच्या ९१ व्या वर्षीदेखील कोरोनावर मात केली आहे. हे खरेच प्रेरणादायी आहे. 
हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

‘पॉझिटिव्ह’ कोरोनाला ठरवले ‘निगेटिव्ह’...  
कोरोनापेक्षा अधिक भयंकर आजार मी बघितले आहेत. जसा मानमोडी, प्लेग असे महाभयंकर आजार येऊन गेले, त्यात गावेच्या गावे बसली. त्यांच्या तुलनेत कोरोना हा महाभयंकर आजार नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. माझ्यासारखी ९१ वर्षांची वृद्धा कोरोनाला हरवू शकते तर तुम्ही तर धट्टेकट्टे आहात. त्यामुळे घाबरून जाऊ नका, सकारात्मक राहा. -पार्वतीबाई बिरारी  

आजीला कोरोना झाल्याचे समजल्यानंतर आम्हाला तिच्या तब्येतीची काळजी वाटत होती. मात्र माझी काळजी करू नका, असे सांगत संपूर्ण कुटुंबीयांना सकारात्मक सांगत मी नक्की बरी होऊन घरी परत येईन, असे सांगत होती. तिची इच्छाशक्ती बघून आम्हाला धीर आला आणि १५ दिवसांनंतर कोरोनाला हरवत आमची आजी सुखरूप घरी परतली आहे. त्यामुळे आमच्या मनातदेखील एक सकारात्मक विचार आला की नव्वदी उलटलेली आजी कोरोनाला हरवू शकते तर त्यात घाबरण्यासारखे काहीच नाही. -राहुल वाघ, नातू 

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-New Zealand FTA: 20 ऑक्टोबरपासून दारू होणार स्वस्त! भारत-न्यूझीलंड FTA मुळे तुम्हाला काय फायदा?

Tempo Bike Accident : भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दोन मोटारसायकलला पाठीमागुन उडविल्याने एक जणाचा मृत्यू; तर एकजण जखमी

Marathi News Live Updates: पाण्याची टाकी पाडताना जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Pitru Paksha 2026: यंदा पितृ पंधरवडा कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या महत्त्वाच्या तिथी

Marathwada Drought : पावसाने पाठ फिरवली; शेतकरी हवालदिल;सोयाबीनला पाणी देण्याची धडपडही निष्फळ; आर्थिक संकट गडद

SCROLL FOR NEXT