नाशिक

ज्येष्ठ नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन

CD
ज्येष्ठांनी हक्कांसाठी कायद्याचा लाभ घ्यावा ॲड. बी. व्ही. सोनवणे : विधी सेवा समितीतर्फे आयोजन सकाळ वृत्तसेवा शिंदखेडा, ता. ६ : मुलगा आई- वडिलांना खाऊ घालत नसेल तर खावटीसाठी प्रांताधिकाऱ्यांकडे अर्ज करता येतो. तसेच, फौजदारी कलम १२५ प्रमाणे खावटी मागता येते. कलम दहामध्ये खावटीच्या आदेशावर फेरफार करण्याचे अधिकार आहेत. मुलांच्या नावावर केलेली प्रॉपर्टी कलम २३ प्रमाणे मुलगा जर वागवत नसेल, तर परत मागता येते. ज्येष्ठांसाठीचा कायदा लहान आहे, पण तो फायद्याचा आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲड. बी. व्ही. सोनवणे यांनी केले. येथील ज्येष्ठ नागरिक संघ व तालुका विधी सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने विश्‍व वृद्ध दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष डॉ. एन. पी. पाटील होते. ॲड. हर्षल अहिरराव यांनी प्रास्ताविक केले. ॲड. निलेश दिसले यांनी वृद्धांसाठी एकात्मिक कार्यक्रमांतर्गत वृद्धाश्रम डे, केअर युनिट, मोबाईल वैद्यकीय व्हॅन आदी सुविधा असल्याचे सांगितले. तसेच शासकीय योजनांवर ९० टक्के सबसिडी आहे. त्या ज्येष्ठांनी उपभोगल्या पाहिजेत, असे आवाहन केले. वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. बी. झेड. मराठे यांनी ज्येष्ठ हे संघर्षमय जीवन जगलेले असतात. आपले पूर्ण आयुष्य ज्यांच्यासाठी खर्च केले, ते दुर्लक्ष करत आहेत ही भावना त्यांच्यात निर्माण होते. त्यांच्याशी मुलांचा संवाद कमी झाला आहे. तो संवाद साधण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. या वेळी ज्येष्ठ नागरिक संघ वाचनालयाचे अध्यक्ष अशोक राखेचा, ज्येष्ठ नागरिक संघाचे खजिनदार गुलाबराव पाटील, सचिव चंद्रकांत डागा, संचालक बी. आर. पाटील, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. वसंतराव पवार, ॲड. प्रशांत जाधव, ॲड. शिरीश सोनवणे, ॲड. ए. एन. शेख, ॲड. पूजा कासार, ॲड. अनिता सोनवणे, ॲड. गीतांजली सोनवणे, ॲड. शारदा मराठे, शिंदखेडा न्यायालयीन कर्मचारी समीर शेख, एन. बी. पवार, योगेश बोरसे, डी. आर. जोशी, ग्रंथपाल सुभाष देसले आदी उपस्थित होते. ॲड. व्ही. एल. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सी. डी. डागा यांनी आभार मानले. -------- ज्येष्ठांना पोटगी मागण्याचा अधिकार ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी विविध कायदेशीर तरतुदी करण्यात आल्या आहेत. मुलांकडून आई- वडिलांची देखभाल होत नसल्यास त्यांना कायद्याच्या माध्यमातून पोटगी मागण्याचा तसेच स्वतःच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे. ज्येष्ठ नागरिकांनी या कायद्यांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विधी सेवा समितीच्या वतीने करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया आघाडी'चा मोर्चा; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा आकाशवाणी परिसरात ठिय्या, दिल्लीत नेमकं काय घडतंय?

Devendra Fadnavis on Gokul Election : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार का?; दस्तुर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेलक्या शब्दात केला खुलासा...

Pune Crime : पुणे हादरलं ! संपत्तीच्या वादातून ८३ वर्षांच्या आजोबाने नातवाला गोळी झाडून संपवलं, कुटुंबाने अपघात असल्याचं भासवलं

Marathi News Live Updates: नवी मुंबई विमानतळावरून पुणे, मुंबईसह विविध शहरांसाठी वाहतूक सुविधा वाढणार; सात ऑक्टोबरपासून इलेक्ट्रिक बससेवा सुरू

आधी भुताची कथा मग २: ३० वाजता खिडकीबाहेर लावलं ते गाणं... कोकणात शर्वरीसोबत जयचा प्रॅन्क, ती इतकी घाबरली की...

SCROLL FOR NEXT