नाशिक

ज्येष्ठांना रेल्वे तिकिटात सवलत द्यावी

CD
फोटो : H31919 -- ज्येष्ठांना रेल्वे तिकिटात सवलत द्या : फेस्कॉम नाशिक, ता. १० : ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीट दरात सवलत मिळावी. तसेच मंत्रालयात स्वतंत्र्य ज्येष्ठ नागरिक विभाग स्थापन करावा, अशा मागण्या जिल्ह्यातील ज्येष्ठांनी केल्या आहेत. अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघ व फेस्कॉम नाशिक प्रादेशिक विभाग यांच्यातर्फे ज्येष्ठांच्या विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात कोविड पूर्व काळात ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात भाडे सवलत मिळत होती. मात्र, मार्च-२०२० पासून ही सवलत बंद करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे प्रवास चैनीचा नसून वैद्यकीय तपासणी, आजारांवरील उपचार, रुग्णांची भेट, सामाजिक कार्य तसेच धार्मिक प्रवासासाठी आवश्यक आहे. त्या मुळे ही सवलत पुर्ववत सुरु करावी. तसेच देशात सुमारे १५ कोटी ज्येष्ठ असून सन २०२५ पर्यंत ही संख्या साधारणतः ३५ कोटींच्या आसपास पोहचेल. त्यामुळे ज्येष्ठांच्या समस्या व मागण्यांसाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक मंत्रालय किंवा स्वतंत्र विभाग स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी महासंघाचे उपाध्यक्ष अशोक होळकर, मनोहर वाघ, देवराम सैंदाणे, प्रकाश महाजन, प्रभाकर क्षीरसागर, श्रीराम कातकाडे यांच्यासह इतर ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balewadi Fire : बालेवाडीत २२ व्या मजल्यावर भीषण आग; परिसरात खळबळ; कक्कड ला विदा इमारतीतील घटना, जीवित हानी टळली

Ranji Trophy 2026-27: बीडच्या ३ खेळाडूंची महाराष्ट्राच्या रणजी संघात निवड! मैदानात कधी उतरणार? जाणून घ्या...

Marathi News Live Updates : सोनम वांगचुक यांचा CJP आंदोलनाला पाठिंबा; नेत्यांच्या सुटकेसाठी उपोषणाचा इशारा

Congress High Command Alert : काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय! सर्व आमदार-खासदारांना तातडीने दिल्लीला बोलावले...

Reliance Jio: भारतात येणार 6G नेटवर्क! इंटरनेटसंबंधी 'रिलायन्स जिओ'चं मोठं अपडेट; पाचपट वेगवान कनेक्टिव्हिटी मिळणार

SCROLL FOR NEXT