senior citizen esakal
नाशिक

रणरणत्या उन्हात वयोवृद्ध लशीसाठी रस्त्यावर! संक्रमणाची भिती

सुदाम गाडेकर

नगरसूल (जि.नाशिक) : मुंबईसारख्या महानगरांमध्ये ‘ड्राइव्ह-इन-व्हॅक्सिनेशन’(drive in vaccination) सारखी योजना राबवून ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण (vaccination) केले जात आहे. मात्र, ग्रामीण भागात ज्येष्ठांसाठी अशी कोणतीही सुविधा नसल्याने तळपत्या उन्हात त्यांना वणवण भटकण्याची वेळ आली आहे.

सुविधा नसल्याने ज्येष्ठांना त्रास

नगरसूल आरोग्य उपकेंद्रात लस घेण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड उडत असतानाच पुरेसी लस उपलब्ध होत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. मेच्या कडक उन्हातही ज्येष्ठ नागरिक पायीच आरोग्य उपकेंद्राकडे जात आहेत. कोरोनाचे भय आणि लशींचा तुटवडा या विचित्र कोंडीत ज्येष्ठ नागरिक सापडला आहे. ४५ वर्षांवरील व ज्येष्ठांना कोरोनाची लस घेण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात प्राधान्य देण्यात आले. मात्र, बस व इतर प्रवासी वाहतूक बंद असल्यामुळे खेड्यापाड्यातील ज्येष्ठांना आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी पायपीट करावी लागते. लसीकरण केंद्रावर तासन्‌ तास उभे राहावे लागते. त्यानंतरही ‘लस संपली की या उद्या’ हे तर रोजचे रडगाणे झाले आहे. लस मिळेल तेव्हा मिळेल. मात्र कोरोना संक्रमणाची भीती ज्येष्ठांना अधिक निर्माण झाली आहे.

ज्येष्ठांना कोरोनाची लस घेण्यासाठी प्राधान्यक्रम देण्यात आला. मात्र, त्यांच्यासाठी खेड्यापाड्यात, वाड्या-वस्त्यांमध्ये घरोघरी लस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने करावे. वयोवृद्धांची हेळसांड थांबली पाहिजे. - धनंजय पैठणकर, सामाजिक कार्यकर्ते, नगरसूल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा

CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन

Illegal Sand Mining: सुखना नदीतून वाळू उपसा करणारे जेरबंद; पाचजणांवर गुन्हा; पाच ट्रॅक्टरसह तीस लाखांचा मुद्देमाल जप्त

Manmad News : इंदूर-पुणे महामार्गावर कंटेनर अपघात; मनमाडजवळ वाहतुकीचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Updates : पालकमंत्री अतुल सावे यांची गाडी गावकऱ्यांनी अडवली

SCROLL FOR NEXT