नाशिक

ज्येष्ठांना रेल्वे तिकिटात सवलत द्यावी

CD
ज्येष्ठांना रेल्वे तिकिटात सवलत द्या : फेस्कॉम नाशिक : ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीट दरात सवलत मिळावी. तसेच मंत्रालयात स्वतंत्र्य ज्येष्ठ नागरिक विभाग स्थापन करावा, अशा मागण्या जिल्ह्यातील ज्येष्ठांनी केल्या आहेत. अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघ व फेस्कॉम नाशिक प्रादेशिक विभाग यांच्यातर्फे ज्येष्ठांच्या विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात कोविड पूर्व काळात ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात भाडे सवलत मिळत होती. मात्र, मार्च-२०२० पासून ही सवलत बंद करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे प्रवास चैनीचा नसून वैद्यकीय तपासणी, आजारांवरील उपचार, रुग्णांची भेट, सामाजिक कार्य तसेच धार्मिक प्रवासासाठी आवश्यक आहे. त्या मुळे ही सवलत पुर्ववत सुरु करावी. तसेच देशात सुमारे १५ कोटी ज्येष्ठ असून सन २०२५ पर्यंत ही संख्या साधारणतः ३५ कोटींच्या आसपास पोहचेल. त्यामुळे ज्येष्ठांच्या समस्या व मागण्यांसाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक मंत्रालय किंवा स्वतंत्र विभाग स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी महासंघाचे उपाध्यक्ष अशोक होळकर, मनोहर वाघ, देवराम सैंदाणे, प्रकाश महाजन, प्रभाकर क्षीरसागर, श्रीराम कातकाडे यांच्यासह इतर ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. फोटो क्रमांक :- एच-31669

Delhi Building Collapse: दिल्लीत भीषण दुर्घटना! चार मजल्यांची इमारत कोसळली, गरोदर मातेसह तिघांचा मृत्यू

Beed News : बीडच्या एलसीबी पथकाचा सन्मान! अंबाजोगाईतील घरफोडीचा छडा लावून ४५ तोळे सोने, १६०० ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात धडाकेबाज कामगिरी

Vidyadhar Anaskar : आरबीआयच्या नव्या पतधोरणामुळे सर्वसामान्यांचे कर्ज महागण्याची शक्यता; समतोल राखण्याचे बँकिंग क्षेत्रासमोर आव्हान

Sakal Karandak Competition : पुणे विभागातून ‘लाजाळू’ अंतिम फेरीत; ‘ईमान’ला द्वितीय; ‘नातीगोती’ला तृतीय क्रमांक

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सातव्या दिवशीही कायम

SCROLL FOR NEXT