tanmay shirode and yasar sheikh esakal
नाशिक

State Level Cricket Tournament : नाशिकचा एक डाव 9 धावांनी मोठा विजय!

यासर शेख १४२, तन्मय शिरोडेचे सामन्यात ६ बळी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या अव्वल साखळी क्रिकेट स्पर्धेच्या ( एम सी ए सिनियर इन्विटेशन सुपर लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात, नाशिकने सिंधुदुर्ग संघाविरुद्ध एक डाव व ९ धावांनी दणदणीत विजय मिळवला. विजयाचे प्रमुख मानकरी ठरले ते शतकवीर यासर शेख, अर्धशतकवीर कर्णधार सत्यजित बच्छाव आणि सामन्यात ६ बळी घेणारा फिरकीपटु तन्मय शिरोडे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केलेल्या सिंधुदुर्गला नाशिकने ४८.३ षटकांत १६० धावांत रोखले. पवन सानप व तन्मय शिरोडेने प्रत्येकी ३ तर तेजस पवार व प्रतीक तिवारीने प्रत्येकी २ गडी बाद केले.

उत्तरादाखल सलामीवीर यासर शेखच्या जोरदार १४२ व कर्णधार रणजीपटू सत्यजित बच्छावच्या ५१ धावांच्या जोरावर ६१.३ षटकांत ९ बाद २९३ धावा करून १३३ धावांची आघाडी घेतली.

दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डावातहि तेजस पवार व तन्मय शिरोडेने प्रत्येकी ३ तर प्रतीक तिवारीने २ व यासर शेख आणि पवन सानपने प्रत्येकी १ बळी घेऊन सिंधुदुर्गला ३३.२ षटकांत १२४ धावांत गुंडाळून नाशिकला मोठा विजय मिळवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Health : गौतम अदाणींनी शरद पवारांची ब्रीच कँडी रुग्णालयात घेतली भेट; प्रकृतीची केली विचारपूस

गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी फॉर्म्युला द्या, हसन मुश्रीफांची सतेज पाटलांना ऑफर; नेमकं काय म्हणाले?

Pune Transport :अल्प उत्पन्नाच्या पीएमपी बस फेऱ्या उद्यापासून बंद, दिवाळीनिमित्त तात्पुरते नियोजन, सुट्ट्या असल्याने प्रशासनाचा निर्णय

Thane News: चोरीच्या संशयावरून विवस्त्र केलं, भररस्त्यात तरुणाला मारहाण; व्हायरल व्हिडीओनंतर ठाण्यात खळबळ

Diwali Gift Ideas : यंदा दिवाळीला द्या हटके गिफ्ट! १ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतील १० भन्नाट पर्याय

SCROLL FOR NEXT