senior citizen  esakal
नाशिक

स्वत:च्या सुरक्षेसाठी ज्येष्ठांनी व्हावे स्मार्ट

ब्रिजकुमार परिहार

नाशिक : काळाची पावलं ओळखून ज्येष्ठ नागरिकांनीही आता स्मार्ट राहिले पाहिजे. मोबाईलमधील स्मार्ट अशा विविध ॲप्सचा स्मार्टपणे वापर केला पाहिजे. तसेच, आपली उपयुक्तता एकंदरितच वाढविली पाहिजे. व्यक्तीगत प्रगतीबरोबरच कौटुंबिक व सामाजिक प्रगती कशी होईल, याबद्दलही ज्येष्ठांनी प्रयत्नशील असले पाहिजे, असे प्रतिपादन निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त धनराज दायमा यांनी केले.

डिसूझा कॉलनी प्रौढ नागरिक मित्र मंडळातर्फे रविवारी (ता. ५) श्री. दायमा यांचे ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा आणि सुरक्षितता’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यात ते बोलत होते. ते म्हणाले, की अपेक्षा ठेवली की दु:ख येतेच. त्यामुळे ज्येष्ठांनी कमीत कमी अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. उतारवयात हेतूपुरस्सरपणे भावनिक गुंतागुंत टाळली पाहिजे. आजमितीस ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठांना केवळ बस प्रवासात अर्ध्या तिकिटाची सुविधा मिळते. याच धर्तीवर रेल्वेनेही सुविधा देण्याची गरज आहे. त्यासाठी ज्येष्ठांसाठी कार्यरत असलेल्या विविध संस्थांनी संघटित होणे गरजेचे आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी काही कायदे आहेत. उतारवयात मुलांनी सांभाळले नाही, तर ते कोर्टात दाद मागू शकतात, तसेच ज्येष्ठ नागरिक एकटे राहात असल्यास तशी माहिती पोलिस ठाण्यात द्यावी. महत्त्वाचे नंबर आपल्याकडे नेहमीसाठी लिहून ठेवावेत. ज्येष्ठत्व हे अनुभवाचे चांदणे घेऊन येत असते. त्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी नक्की करावा आणि आपली भूमिका लवचिक ठेवावी. मृत्यूपत्राबरोबरच इच्छापत्रही तयार करून ठेवावे. डिजिटल युगात स्वतःला सुरक्षित ठेवावे. सोशल मीडियावर वावरताना विवेकबुद्धी जागृत ठेवावी. एकूणच काय तर निसर्ग नियमाने ज्येष्ठत्व येणारच असते. ते हसत स्वीकारावे आणि स्वतःला आनंदी ठेवावे, असा आनंदी जीवनाचा मूलमंत्रही श्री. दायमा यांनी या वेळी दिला.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद पाटील यांनी प्रास्ताविक केले. श्री. कादी यांनी परिचय करून दिला. स्वाती पाचपांडे यांनी सूत्रसंचालन केले व पसायदान सादर केले. प्रदीप देवी यांनी आभार मानले. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह ज्येष्ठ नागरिक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT