Hard Labour esakal
नाशिक

Nashik Crime: मायलेकींना मारहाण अन् विनयभंगप्रकरणी सक्तमजुरीची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : जिल्हा परिषदेच्या पाठीमागे असलेल्या वसाहतीतील घरात शिरून महिलेस मारहाण करीत तिच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या तिघांना जिल्हा न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. १५ सप्टेंबर २०१३ रोजी सदरची घटना घडली होती. (sentenced to hard labor in case of beating and molestation of mother daughter Nashik Crime)

बालाजी अर्जुन शिनगारे (३४, रा. कुलस्वामिनी अपार्टमेंट, सिद्धेश्वर नगर, जेलरोड), प्रफुल्ल विलास शिंदे (२७, रा. नाईकनगर, देवळाई, छत्रपती संभाजीनगर), प्राजक्ता विलास शिंदे उर्फ प्राजक्ता बालाजी शिनगारे (२८, कुलस्वामिनीनगर, सिद्धेश्‍वर नगर, जेलरोड) अशी आरोपींची नावे आहेत.

पीडितेच्या फिर्यादीनुसार आरोपी बालाजी हा त्यांच्या घरात शिरून पीडितेच्या आईस मुलीवर प्रेम असल्याचे सांगितले. पीडितेच्या आईने बालाजीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने पीडितेच्या आईस मारहाण करीत गंभीर जखमी केले.

तसेच, पीडितेचा विनयभंग केला. आरोपी प्रफुल्ल व प्राजक्ता यांनी पीडित मायलेकीस शिवीगाळ, मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यानुसार तत्कालीन सहायक निरीक्षक एम. एम. नाईक यांनी तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सहायक सरकारी अभियोक्ता संध्या वाघचौरे यांनी सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद केला.

त्यानुसार आरोपींविरोधात साक्षीदार, परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे प्रथम वर्ग न्यायाधीश कैलास के. चाफळे यांनी आरोपी बालाजी शिनगारे यास विनयभंगप्रकरणी दोन वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.

तर, बालाजी याच्यासह प्राजक्ता शिनगारे व प्रफुल्ल शिंदे या तिघांना घरात अनधिकृतपणे शिरणे, मारहाण केल्याप्रकरणी २ महिने साधा कारावास व प्रत्येकी ३ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात पोलिस अंमलदार पी. बी. जेऊघाले यांनी पैरवी अधिकारी म्हणून पाठपुरावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chh. Sambhajinagar Accident: ट्रॅव्हल्सचा उघडा दरवाजा आला काळ बनून! दर्शनावरून परतताना भीषण अपघात; दोन महिला भाविकांचा जागीच मृत्यू

Mundhwa Land Scam : जंगम मालमत्ता दाखविण्याचा प्रकार, मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण; सह दुय्यम निबंधकांकडून अधिकाराचा गैरवापर

Latest Marathi News Update LIVE: गोरेगाव स्टेशन परिसरात अनधिकृत भाजीवाल्यांचा वाढता दादागिरीचा कहर

Mundhwa Land Scam : 'मुंढवा' प्रकरणातून बावधनपर्यंत धागेदोरे! सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्या सर्व व्यवहारांची तपासणी

Supreme Court: न्यायव्यवस्थेवर टीका करण्यास आक्षेप नाही, पण... सर्वोच्च न्यायालयाचा इशारा, दिली कौतुकास्पद शिक्षा

SCROLL FOR NEXT