bank account  esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : इच्छुकांना स्वतंत्र बँक खात्याची सक्ती; लोकसभा निवडणूक तयारी

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला खास निवडणुकीसाठी बँकेत स्वतंत्र खाते उघडावे लागणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला खास निवडणुकीसाठी बँकेत स्वतंत्र खाते उघडावे लागणार आहे.

भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ चा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असून या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहेत. (separate bank account for aspirants Lok Sabha Election Preparations nashik news)

आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने संभाव्य उमेदवारांनी निवडणूक खर्चासाठी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी किमान एक दिवस अगोदर स्वतंत्र बँक खाते उघडावे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात विविध राजकीय पक्षांचा वेगवेगळ्या कारणांवर खर्च होत असला तरी त्याची अनेकदा नोंद होत नाही.

या संदर्भात निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार आता प्रत्येक राजकीय पक्षाच्या आणि अपक्ष उमेदवारांना निवडणुकीच्या खर्चाच्या दृष्टीने कुठल्याही राष्ट्रीयीकृत बँक आदी ठिकाणी स्वतंत्र खाते उघडणे आवश्यक आहे. ज्या दिवशी उमेदवार नामांकन अर्ज भरेल त्याच्यापूर्वी त्यांनी खाते उघडणे आवश्यक आहे.

त्या खात्याचा क्रमांक आणि बँकेचा नामांकन पत्रामध्ये उल्लेख करावा लागेल. या खात्याच्या माध्यमातून उमेदवाराला खर्च करावा लागणार आहे. दर आठ दिवसांनी निवडणूक अधिकाऱ्‍यांच्या आदेशानुसार संबंधित उमेदवारांचा खर्चाचा तपशील बँकेकडून घेण्यात येईल आणि नोंद त्यांच्याकडे राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : थरकाप उडवणारी घटना! विक्रोळी स्थानकावर लोकलचा थांबा चुकला, काही क्षणातच मोठा अनर्थ टळला

Mangalwedha Crime: सख्खा भाऊ झाला पक्का वैरी! भावाचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून; मंगळवेढा तालुक्यातील घटना, त्रासाला कंटाळला अन् कृत्य..

Ashok Kharat: अशोक खरातने केली सोलापुरात जमिनीची खरेदी; अतिरिक्त मोबदल्यासाठी लावली आंब्याची झाडे, भूसंपादन प्रक्रियेत घोटाळे?

Breaking News Live Update: भायंदर-नायगाव दरम्यान विद्युत यंत्रणेत बिघाड, लोकल सेवा विस्कळीत

Harshvardhan Sapkal: राष्ट्रवादी काँग्रेसला आमचा विरोध कायम: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, गुन्हा नोंदविण्याबाबत राष्ट्रवादीचेही मौन!

SCROLL FOR NEXT