GDP esakal
नाशिक

Sakal Impact : GDP पंचवार्षिक आराखड्यासाठी स्वतंत्र बैठक; सर्व आमदारांच्या सूचनांचा होणार समावेश

नाशिक जिल्ह्याचा जीडीपी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या पंचवार्षिक आराखड्यात आमदार, खासदारांच्या सूचनांचा समावेश करण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Sakal Impact : नाशिक जिल्ह्याचा जीडीपी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या पंचवार्षिक आराखड्यात आमदार, खासदारांच्या सूचनांचा समावेश करण्यात येणार आहे.

यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांची बैठक होईल. (Separate meeting for GDP Five Year Plan nashik news)

विशेष म्हणजे यात नागरिकांनाही काही सूचना मांडायच्या झाल्यास त्यांनी लेखी देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सोमवारी (ता. ८) जिल्हा विकास व कृती आराखडा आमदारांना देण्यात आला. याविषयी त्यांच्या काही सूचना असतील तर कळविण्याचे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी यांनी केले.

जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या या आराखड्याविषयी सर्वपक्षीय आमदार अनभिज्ञ असल्याचे निदर्शनास आले. ‘सकाळ’ने याविषयी सोमवार (ता. १५) ते गुरुवार (ता. १८)पर्यंत मालिका प्रसिद्ध करून या विषयावर प्रकाशझोत टाकला.

सर्वपक्षीय आमदार अनभिज्ञ असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यावर पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा स्वतंत्र बैठक घेण्याचे नियोजन जिल्हा नियोजन समितीने केले आहे. पुढील आठवड्यात साधारणत: २५ जानेवारीला ही बैठक होण्याची शक्यता आहे. परंतु, तारीख अद्याप अंतिम झालेली नाही.

आमदारांना आवाहन

जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने प्राथमिक स्तरावर हा आराखडा तयार करण्यात आला. त्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी आमदारांच्या सूचना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यादृष्टीने सर्वच आमदारांनी या आराखड्याकडे गांभीर्याने पाहून त्यात सुधारणा करण्यासाठी आपल्या सूचना कळविण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT