नाशिक

तिनही जिल्ह्यांना नागरिकांच्या स्वतंत्र प्रादेशिकतिनही जिल्ह्यांना नागरिकांच्या स्वतंत्र प्रादेशिक

CD
तिनही जिल्ह्यांसाठी स्वतंत्र प्रादेशिक विभाग --- ज्येष्ठ नागरिकांच्या घटनात्मक मान्यता बहाल सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १३ : महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) मुंबईच्या खानदेश प्रादेशिक विभागाचे ऐतिहासीक विक्रेंदीकरण केले आहे. जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांसाठी स्वतंत्र प्रादेशिक विभाग स्थापन करण्याच्या प्रस्तावाला नियामक मंडळाने घटनात्मक मान्यता दिली आहे. यापुढे खानदेश प्रादेशिक विभाग या एकत्रित रचनेएवजी प्रत्येक जिल्हा स्वतंत्र प्रादेशिक विभाग म्हणून कार्यरत राहणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्‍नावर स्थानिक पातळीवर अधिक प्रभावीपणे काम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खानदेश प्रादेशिक विभाग फेस्कॉम धुळे या प्रादेशिक विभागासंदर्भात २९ सप्टेंबरला नवी मुंबई येथे झालेल्या फेस्कॉमच्या नियामक मंडळाच्या बैठकीत खानदेश प्रादेशिक विभागाच्या विभाजनास मान्यता मिळाली आहे. १ एप्रिल २०२७ पासून जळगाव, धुळे व नंदुरबार असे तीन स्वतंत्र प्रादेशिक विभाग अस्तित्वात येणार आहेत. त्यामुळे ३१ मार्च २०२७ पर्यंत खान्देश प्रादेशिक विभाग फेस्कॉम धुळेच अस्तित्वात राहणार आहे. मात्र, त्रि-जिल्हा विभाजनाचे आदेश अद्याप निर्गमित झालेले नाहीत, असे संघांचे अध्यक्ष ॲड. अरुण धांडे व सचिव विकास बोरोले यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; हल्लेखोर महिला दारुच्या नशेत, शिव्याही दिल्या

Pune Crime : गणेशोत्सवात दागिने चोरणारी हरियाणाची टोळी गजाआड; साडेचार हजार किलोमीटर पाठलाग करून कारवाई

Mohol News : आठव्या दिवशीही जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांचे उपोषण सुरूच; प्रकृती खालावली, दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

Saudi Attack: 'हल्ल्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू नका!'... सौदीतील भारतीयांना कोणी दिला इशारा?

Kognoli Toll Protest: कोगनोळी टोलनाक्यावर तणाव! राजू शेट्टींचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि पोलिसांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT