fund esakal
नाशिक

Nashik News : महापालिकेत सुरक्षारक्षकांची सेवा खंडित; पावणेदोन कोटींची होणार बचत

महापालिकेत अडीच वर्षांपासून कार्यरत असलेल्या महाराष्ट्रात सुरक्षा दलातर्फे नियुक्त सुरक्षारक्षकांची सेवा खंडित करण्याचा निर्णय आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांनी घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महापालिकेत अडीच वर्षांपासून कार्यरत असलेल्या महाराष्ट्रात सुरक्षा दलातर्फे नियुक्त सुरक्षारक्षकांची सेवा खंडित करण्याचा निर्णय आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांनी घेतला आहे. २० जानेवारी २०२४ पासून या सुरक्षारक्षकांची सेवा खंडित केली आहे.

यामुळे महापालिका प्रशासनाच्या खर्चात सुमारे पावणेदोन कोटींची बचत होणार आहे. (service of security guards in municipal corporation is interrupted nashik news)

तत्कालीन महापौर ताहेरा शेख व तत्कालीन आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या सूचनेनुसार २०२१ मध्ये महापालिका प्रशासनातील मनपा इमारत, प्रवेशद्वार यांसह विविध ठिकाणी या सुरक्षारक्षकांची सेवा घेण्यात आली होती. या वर्षी महाराष्ट्र सुरक्षा दलाने प्रतिसुरक्षारक्षक पाच हजार रुपये मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती.

ही मागणी अमान्य करतानाच सुरक्षारक्षकांची सेवा तत्काळ प्रभावाने खंडित करण्याचे आदेश महापालिकेचे सुरक्षा तथा अग्निशमन अधीक्षक संजय पवार यांना दिले. सुरक्षा रक्षकांच्या वेतनावर दरमहा सुमारे बारा लाख रुपये खर्च होत होते.

या ठिकाणी होती सुरक्षारक्षकांची नियुक्ती

* मनपा मुख्य प्रशासकीय इमारत

* मनपा प्रवेशद्वार

* आयुक्त दालन

* अलहाज हारुण अन्सारी रुग्णालय

* कॅम्प रुग्णालय

* जलशुद्धीकरण केंद्र

* आयुक्त निवासस्थान

* आयुक्तांना सुरक्षारक्षक

महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या या सुरक्षारक्षकांमध्ये एक सहाय्यक सुरक्षा अधिकारी, तीन पर्यवेक्षक, पाच आर्मगार्ड, दहा महिला सुरक्षारक्षक, २८ सुरक्षारक्षक जवान यांचा समावेश होता. शहरातील अनेक नगरसेवक, राजकीय नेते, प्रमुख पदाधिकारी यांच्याविषयी हे सुरक्षारक्षक अनभिज्ञ होते.

त्यातूनच प्रवेशद्वारावर आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्यासह अनेकांना नाहक अडविण्याचे प्रकार घडले. त्यातून सुरक्षारक्षक, सामान्य नागरिक, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी अनेकदा वाद, बाचाबाचीचे प्रसंगही घडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकाटेंनंतर महायुतीच्या महिला मंत्री वादाच्या भोवऱ्यात,भरसभेत थेट अधिकाऱ्याला थप्पड मारण्याची धमकी, व्हिडिओ व्हायरल

मनोज जरांगे लिफ्टने वरच्या मजल्यावर जात होते, अचानक बिघाड झाला अन् थेट जमिनीवर आदळली लिफ्ट; बीडमधील घटनेनं खळबळ

Satara Politics: जावळीकर पुन्‍हा संघर्षाच्‍या वळणावर?; शिंदेंच्‍या सत्‍कारावेळीच मानकुमरेंच्‍या अन्‍याय मोर्चा

VIDEO: 'पिंगा गं पोरी पिंगा...' 'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील सावलीचा नऊवारी साडीत भन्नाट डान्स, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Video : वर्गात गुरुजी शिकवतानाच कोसळलं शाळेचं छत, तिथेच एक विद्यार्थी....; घटनेचा व्हिडीओ आला समोर

SCROLL FOR NEXT