Court Order esakal
नाशिक

National People Court : लोकअदालतीत साडेआठ हजार प्रकरणांचा निपटारा

सकाळ वृत्तसेवा

National People Court : जिल्ह्यात गेल्या रविवारी (ता. ३०) झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत ८ हजार ८७५ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला तडजोड म्हणून ५५ कोटी ५२ लाख ११ हजार ६२८ रुपये वसुल करण्यात आले आहेत. जिल्हा सत्र न्यायालयासह जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये सदरील राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. (Settlement of eight half thousand cases in national Peoples Court nashik news)

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणच्या आदेशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी जिल्ह्यात ४७ पॅनल तयार करण्यात आले होते. यंदाच्या लोकअदालतीत तडजोडीसाठी ७० हजार १०० दावा दाखल पूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील सहा हजार ७६७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

धनादेश न वटल्याप्रकरणी ८०८, मोटार अपघाताची १०५, कामगार विषयक ७, कौटुंबिक वादाचे ८१, फौजदारी तडजोडपात्र २७० प्रकरणे व इतर ८३७ प्रकरणे अशी एकूण २ हजार १०८ प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात यश आले आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचीव शिवाजी द. इंदलकर व जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे यांच्यासह जिल्ह्यातील न्यायिक अधिकारी, वकील, कर्मचारी यांनी लोक अदालतीच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope : 12 तारखेपासून सुरू होतोय गजकेसरी राजयोग! वृषभसह 4 राशीचं भाग्य उजळणार; होणार धनलाभ, प्रेमात यश, मोठं स्वप्न होईल पूर्ण

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

SCROLL FOR NEXT