नाशिक

आरोग्यसेवा जनतेपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प

CD
आरोग्यसेवा जनतेपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.७ : महाराष्ट्र शासनाच्या ९ सप्टेंबर २०२६ च्या शासन निर्णयानुसार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांतील १७ सेवा दवाखान्यांमध्ये विमेदार रुग्णांसाठी आरोग्य तपासणी, जनजागृती, प्रतिबंधात्मक आरोग्य मार्गदर्शन आणि विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात मॅग्नम ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सनेही सहभाग घेतला आहे. दिंडोरी आणि नाशिक रोड येथील इएसआयसी डिस्पेन्सरीमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सीपीआर प्रशिक्षण घेण्यात आले. अचानक हृदयक्रिया बंद पडल्यास करावयाची प्राथमिक मदत, सीपीआरची योग्य पद्धत आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. विविध आरोग्य शिबिरांचा विमेदार रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. अनिता भामरे आणि प्रशासन अधिकारी डॉ. अंजली नागापूरकर यांनी केले आहे.

Delhi Building Collapse: दिल्लीत भीषण दुर्घटना! चार मजल्यांची इमारत कोसळली, गरोदर मातेसह तिघांचा मृत्यू

Beed News : बीडच्या एलसीबी पथकाचा सन्मान! अंबाजोगाईतील घरफोडीचा छडा लावून ४५ तोळे सोने, १६०० ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात धडाकेबाज कामगिरी

Vidyadhar Anaskar : आरबीआयच्या नव्या पतधोरणामुळे सर्वसामान्यांचे कर्ज महागण्याची शक्यता; समतोल राखण्याचे बँकिंग क्षेत्रासमोर आव्हान

Sakal Karandak Competition : पुणे विभागातून ‘लाजाळू’ अंतिम फेरीत; ‘ईमान’ला द्वितीय; ‘नातीगोती’ला तृतीय क्रमांक

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सातव्या दिवशीही कायम

SCROLL FOR NEXT