Water Shortage esakal
नाशिक

Water Shortage : जुना जलकुंभ पाडल्याने सटाण्यात तीव्र पाणी टंचाई! पालिका बांधणार नविन जलकुंभ

सकाळ वृत्तसेवा

Water Shortage : शहरातील नामपुर रस्त्यावरील जिजामाता गर्ल्स हायस्कुलसमोर १९८६मध्ये उभारलेल्या (कै) तुकाराम गणपत सोनवणे जलकुंभाचे बांधकाम जीर्ण झाल्याने सोमवारी (ता. २२) रात्री उशिरा साडेतीनच्या सुमारास या जलकुंभाचे बांधकाम पाडण्यात आले.

या जागेवर पालिका प्रशासन नवीन आठ लक्ष लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारणार आहे. (Severe water shortage in Satna due to demolition of old water tank municipality will build new reservoir nashik news)

दरम्यान, हा जलकुंभ पाडताना मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने नामपूर रस्त्यासह सर्वच नववसाहतींमध्ये ऐन कडक उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई सुरू झाली. जनतेवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली असून, पालिकेने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

हा जलकुंभ ३७ वर्ष जुना झाल्याने त्याचे नुकतेच सामनगाव (नाशिक) येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आणि पुणे येथील शासकीय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यामार्फत तांत्रिक लेखा परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यात आले होते.

या परीक्षणानुसार जलकुंभाचे बांधकाम जीर्ण झाल्याने ते धोकादायक असून, कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्‍यता असल्याच्या सूचना दोन्ही महाविद्यालयांनी केल्या होत्या.

त्यानुसार पालिकेच्या सर्वसाधारण सभेत जलकुंभाचे बांधकाम पाडण्याचा ठराव मंजूर करून याच जागेवर १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून नव्याने जलकुंभ उभारण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकारी नितीन बागुल यांनी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, नविन जलकुंभाचे बांधकाम होईपर्यंत या परिसरावर पाणीटंचाईचे संकट राहणार आहे. या जलकुंभावर अवलंबून असलेल्या भागातील जनतेला याबाबत कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने ऐन कडक उन्हाळ्यात गेल्या तीन दिवसांपासून भीषण पाणीटंचाई सुरू असून, पुढील काही दिवस शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे शहरवासीयांमध्ये संतापाची भावना आहे.

आज, उद्या पाणी बंद

मध्यरात्री या जलकुंभाचे बांधकाम पाडताना शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या ३०० मि. मी. च्या मुख्य जलवाहिनीस अचानक गळती सुरू झाली. त्यामुळे या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम प्रशासनाने हाती घेतले असून, बुधवारी (ता. २४) व गुरुवारी (ता. २५) शहरातील सर्व पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे.

मात्र, शहरात एका दिवसाआड पाणी येत असून, जलकुंभाच्या कामामुळे गेल्या दोन दिवसांपासून नळांना अवघे दहा मिनिटेच पाणी येत आहे. त्यामुळे तीन दिवस पुरेल इतक्या पाण्याची साठवणूक नसल्याने नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: तीन महिन्यांत ५ भेटी… ठाकरे बंधुंची युती पक्की की अजूनही चर्चा? पाहा सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेटीची टाइमलाइन

Kojagiri Pournima 2025: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मार्ग मंगळवारपर्यंत बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Dhule Traffic : धुळे वाहतूक कोंडी सुटली! गडकरींच्या निर्देशानंतर फागणे-धुळे वळण रस्त्याची एक बाजू १५ ऑक्टोबरपर्यंत खुली होणार

District Judge Dismissed: माेठी बातमी!'सातारा जिल्हा न्यायाधीश बडतर्फ'; तीन ऑक्टोबरपासून पदमुक्त, नेमकं काय कारण?

Irani Cup 2025: विदर्भाने पटकावला विजेतेपदाचा मान; इशान किशन, पाटिदार, ऋतुराजसारखे स्टार खेळाडू असलेल्या संघाला केलं पराभूत

SCROLL FOR NEXT