नाशिक

अपूर्ण गटारीमुळे सांड पाणी थेट घरात शिरत असल्याने रहिवाशांमध्ये नाराजी

CD
(पान ४ ला मेन) MSI26B09789 म्हसदी : देऊर रस्त्यावर भुपेश देवरे यांच्या घरात शिरलेले सांडपाणी. ---------------------- अपूर्ण गटारीमुळे सांडपाणी थेट घरात रहिवाशांकडून नाराजी; तक्रारींकडे प्रशासनाचा कानाडोळा सकाळ वृत्तसेवा म्हसदी, ता. २४ : येथील बसस्थानक परिसरातील रस्त्याचे काम गेल्या दहा महिन्यांपासून कासवगतीने सुरू आहे. रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम बऱ्यापैकी झाले असले तरी अपूर्ण गटारीमुळे सांडपाणी चक्क घरात शिरत असल्याने रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याची ओरड होत आहे. ------- येथील बसस्थानक परिसरात गेल्या दहा महिन्यांपासून रस्ता काँक्रीटीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. मोठे काम असल्याने दिरंगाई होत असल्याचे सर्वश्रुत असले तरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारीचे काम रखडले आहे. त्यामुळे जमीनी लगत असलेल्या घरांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सांडपाणी शिरत असल्याने यावर स्थानिक ग्रामपंचायत देखील उपाययोजना करण्यासाठी अपूर्ण पडत आहे. सध्या ग्रामपंचायतीत प्रशासक असल्याने तक्रार कोणाकडे करावी, हा प्रश्न आहे. देऊर रस्त्यावर भुपेश सुनील देवरे यांचे घर आहे. घराची पुढची बाजू जमिनीलगत असल्याने गटारीचे सर्व सांडपाणी थेट घरात शिरत असल्याने देवरे कुटुंबीय त्रस्त झाले आहे. स्थानिक ग्रामपंचायत व साक्री येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेत नसल्याचा आरोप भुपेश देवरे यांनी केला आहे. ------ रहिवाशांच्या आरोग्याशी खेळ जनतेचे आरोग्य सुव्यवस्थित राहावे म्हणून शासकीय यंत्रणा नेहमीच सतर्क राहत असल्याचा गाजावाजा केला जातो. म्हसदीत मात्र संबंधित यंत्रणेच्या चालढकलपणामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारण रस्त्याच्या कडेला एका बाजूला पाणीपुरवठ्याची पाईपलाईन गेली आहे. जेसीबी यंत्राच्या खोदकामात पाईपलाईन लिक झाल्याने पाणी वाया जात आहे. त्याच पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनमध्ये सांडपाणी शिरण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. अशुद्ध, नळाला पाणी आल्यावर सुरुवातीला दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याची तक्रार महिलांनी केली आहे. जवळपास रस्ता काँक्रीटीकरण झाले असले तरी दोन्ही बाजूला प्रचंड घाण असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ------- बांधकाम विभागाकडून चालढकल म्हसदी परिसरातील मुख्य बाजारपेठेचे गाव असल्याने लगतच्या दहा ते बारा गावांचा दैनंदिन संपर्क येतो. दिवसभर वाहनांची वर्दळ असल्याने गटारीच्या अर्धवट कामामुळे प्रचंड धुळ उडत आहे. तसेच, जुन्या बसस्थानकालगत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा व अंगणवाडी आहे. रस्ता ओलांडताना चिमुकल्यांना दररोज मोठी कसरत करावी लागते. विद्यार्थ्यांना रस्ता पार करून देण्यासाठी शिक्षकांना डोळ्यात तेल घालून उभे रहावे लागते. या गंभीर समस्येकडे बांधकाम विभाग चालढकल करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ------------ गेल्या काही महिन्यांपासून सर्व गावाचे वाहून येणारे सांडपाणी गटार नसल्याने थेट घरात शिरत आहे. प्रंचड दुर्गंधीयुक्त पाणी असल्याने डासांचा प्रादुर्भाव सोसावा लागत आहे. ग्रामपंचायतीकडे अनेकवेळा तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही. केवळ टोलवाटोलवी केली जात आहे. - सुनीता देवरे, गृहिणी, म्हसदी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंला SEBIचा दणका! 546 कोटी परत करण्याचे आदेश, 67 कोटी व्याज अन् 11.5 कोटींचा दंडही भरावा लागणार

IND vs NZ 2nd T20I Live: श्रेयस अय्यरचा त्रिफळा, अक्षर पटेलचा अफलातून झेल! मिचेल सँटनरने ११ चेंडूंत ३ विकेट्स घेतल्या, Video

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवा खुलासा! सुरतमध्ये लपवलेले शस्त्र जप्त, 4 नवीन संशयितांना अटक

दिवाळीनंतर चमकणार 'या' ३ राशींचे नशीब! बुधाची सरळ चाल ठरणार गेमचेंजर; हातात खेळणार अपार पैसा...

Latest Marathi News Live Update : ‘मुलांकडे माहिती आहे, पण ज्ञान नाही; शिक्षकांची जबाबदारी मोठी’ – देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT