MIM workers raising slogans on the streets. esakal
नाशिक

Nashik : मनपा आयुक्तांवर फेकले गटारीचे पाणी; रास्तारोको आंदोलनावेळी नागरीकांचा संताप

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील जुना आग्रा महामार्गावरील देवीच्या मळा भागातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने दुर्गंधी पसरली आहे. खड्ड्यांमुळे या भागात वारंवार अपघात होतात. रस्ता व गटार दुरुस्तीच्या मागणीसाठी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांना धारेवर धरत त्यांच्या अंगावर गटारीचे पाणी फेकल्याने येथे खळबळ उडाली आहे. संतप्त आंदोलनकर्त्यांनी आयुक्तांवर प्रश्‍नांचा भडीमार करत त्यांना खडेबोल सुनावले. (Sewage water thrown on municipal commissioner Anger of citizens during Rasta Roko movement Nashik Latest Marathi News)

रस्त्यावर आंदोलन करणारे एमआयएमचे कार्यकर्ते.

देवीचा मळा परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती आहे. या भागातील जुना आग्रा महामार्ग प्रमुख रस्ता आहे. रस्ता नादुरुस्त असल्याने वाहनचालकांची तारांबळ उडते. या भागातील गटारींच्या पाण्याचा निचरा होत नाही. तुडूंब भरलेल्या गटारी रोज स्वच्छ केल्या जात नाहीत. गटारीचे पाणी रस्त्यावर येते. रस्त्यावरील खड्ड्यात गटारीचे पाणी साचते. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

महापालिकेकडे वारंवार मागणी करुनही रस्ता व गटारीचे काम होत नसल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. दुपारी एकला मौलाना मुफ्ती यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन सुरु झाले. काही आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर लोळण घेतले. आमदार मौलाना मुफ्ती यांनी दुपारची नमाज (जोहरची) देखील आंदोलनस्थळी रस्त्यावरच पठण केली. कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडल्याने अडीचच्या सुमारास दुपारच्या जेवणाचा स्वाद आंदोलनस्थळीच घेतला.

आंदोलनस्थळी रस्त्यावर नमाज पठण करताना आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल व कार्यकर्ते.

आंदोलनकर्त्यांनी कमिशनर ‘तेरी तानाशाही नही चॅलेंगी, सिटी इंजिनियर मुर्दाबाद, कमिशनर मुर्दाबाद’ आदी घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. दरम्यानच्या काळात महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी आंदोलनस्थळी भेट देत मौलांसह आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. मात्र, आंदोलनकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या. काही कार्यकर्त्यांनी थेट आयुक्तांच्या अंगावर गटाराचे पाणी फेकले. या प्रकारानंतर पोलिसांनी आयुक्तांना बाजूला नेले.

आंदोलनामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. दुपारनंतर तातडीने दोन जेसीबी मागवत काम सुरु करण्यात आले. सायंकाळी आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात अत्तर हुसेन अश्रफी, साजिद अन्सारी, राशीद अय्युब, अन्सारी हमीद हुसेन, हाफिज अब्दुल्लाह, हुसेन अन्सारी आदींसह परिसरातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

"जुना आग्रा रस्त्याच्या काँक्रीटीकारणांसाठी सन २०१९ मध्ये ११ कोटी ७८ लाख मंजूर झाले होते. मी मंजूर केलेला निधी महापौर व स्थानिकांडून रोखण्यात आला. जुना आग्रा रस्त्याची वर्षभरापासून बिकट अवस्था झाली आहे. या रस्त्यावर गेल्या पंधरा दिवसापासून गटारीचे पाणी रस्त्यावर येत आहे. पाण्यामुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. रोज येथे लहान- मोठे अपघात होतात. परिसरातील नागरिक व व्यावसायिक त्रस्त झाले आहे. रस्ता व गटारीचे काम तातडीने करावे. अन्यथा, भविष्यात तीव्र आंदोलन केले जाईल."

- मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, आमदार, मालेगाव मध्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : पर्रिकर न सांगता फिरायचे तसे फिरा, पुण्यातील महिलेनं सल्ला देताच अजित पवार म्हणाले, कोण पर्रिकर? नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Heavy Rain: गेवराईत शनिवारी रात्री मुसळधार पाऊस; नदी नाल्यांचा पाणी ओसांडून अनेक गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे उत्पन्न धोक्यात

Kolhapur Crime : पहाटे चोरी करून रात्री थ्री स्टार हॉटेल मजा मारायची, लूटमारीचा चंगळवाद; CCTV मध्ये सापडताच पोलिसांनी केला कार्यक्रम

Mental Health: दर सात जणांपैकी एकाला मानसिक विकार; २०२१ मधील जगभरातील स्थिती, एक अब्ज जणांना त्रास, ‘डब्लूएचओ’ची माहिती

Sanjay Raut: अजित पवारांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली... नको ते बोलले... थेट पाकिस्तानशी उल्लेख

SCROLL FOR NEXT