नाशिक

पंचाळे विद्यालयाचे मैदानी खेळांत यश

CD
SNR26B22991 पंचाळे ः एस. जी. विद्यानिकेत विद्यालयातील खेळाडूंसमवेत मार्गदर्शक शिक्षक. ------------------- एस. जी. विद्यानिकेतनचे मैदानी स्पर्धेत यश ------------- सिन्नर, ता.७ ः पंचाळे येथील एस. जी. विद्यानिकेतन विद्यालयाने विविध मैदानी स्पर्धेत यश मिळविले. जिल्हा क्रीडा कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषदेतर्फे या स्पर्धा झाल्या. कराटे, मैदानी क्रीडा, धनुर्विद्या आणि तायक्वांदो या विविध क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी यश मिळविले. कराटे स्पर्धेत १३ खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यापैकी ९ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. तेजस्विनी पवार, कार्तिकी ठाकरे, वैष्णवी नरोडे, रूपाली निकम, समीक्षा पवार, साई थोरात, आकाश थोरात, श्लोक बेलोटे, ऋषिकेश सैंद्रे यांनी कराटे स्पर्धेत यश मिळविले. १७ वर्षे आतील गटात आरोही जाधव, स्वामिनी नवले यांनी द्वितीय, तर अनुष्का हांडोरे, सिद्धीका शांताराम नवले यांनी तृतीय क्रमांक मिळविला. दोनशे व पंधराशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत शुभम थोरात याने प्रथम क्रमांक मिळविला. ११० मीटर हर्डल्समध्ये अजय सोंगाळ याने बाजी मारली. रिले स्पर्धेत यश थोरात, आदित्य कांगणे, अथर्व डुंबरे, संदेश ढोकने, शुभम थोरात यांनी यश मिळविले. १९ वर्षांखालील रिले स्पर्धेत साईराज बेलोटे, अथर्व डुंबरे, पंकज साळुंखे, यश चतुर याने द्वितीय तर भालाफेक स्पर्धेत गौरव नवले याने तृतीय क्रमांक मिळविला. ६०० मीटर धावण्यात तनुजा डुंबरे, ८० मीटर हर्डल्स व १०० मीटर धावण्यातही ती द्वितीय आली. ११० हर्डल प्रकारात खुशी आहेर हीची जिल्हास्तरासाठी निवड झाली. खुशी आहेर हिची ११० मीटर हर्डल्स या प्रकारात जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. विशाल घुले याने क्रॉस कंट्री सहा किलोमीटर धावण्यात यश मिळविले. जिल्हास्तरासाठी त्याची निवड झाली आहे. --------------- धनुर्विद्या स्पर्धेत समीक्षा गडाख हिने १९ वर्षे वयोगटात यश मिळविले. तिची विभागस्तरासाठी निवड झाली. मनकर्णिका देशमुख हिने तायक्वांदोमध्ये विभागस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. दीपक थोरात यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे सचिव राजेश गडाख, मुख्याध्यापक विलास पवार, व्यवस्थापक राजेंद्र गडाख, उच्च माध्यमिक विभागप्रमुख प्रवीण शेलार, प्राथमिक मुख्याध्यापक नवनाथ थोरात यांनी यशस्वितांचा गौरव केला. -------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

३०० रुपये घेतले नाही, ४०० थेट खिशात घातले; RTO पोलिसाच्या 'वसुली'चा व्हिडीओ व्हायरल

अमिताभ बच्चन यांना वकिलाची कायदेशीर नोटीस; KBC मधील 'त्या' प्रश्नावरून नवा वाद, नेमकं प्रकरण काय?

Road Accident: कारची बैलाला धडक; दुचाकीस्वाराचा बळी ,बिथरलेल्या बैलाच्या शिंगाने छातीला गंभीर दुखापत

Overloaded Sugarcane Trucks: उसाच्या ओव्हरलोडिंगने रस्‍त्‍यांवर अपघातांचे सत्र; नियमांची पायमल्ली अन् यंत्रणाही ढिम्म

Unseasonal Rain: दुष्काळाच्या झळांनंतर अवकाळीचा घाला ,रामटेकचा बळीराजा दुहेरी संकटात; ढगाळ वातावरणामुळे धास्ती वाढली

SCROLL FOR NEXT