नाशिक

शहादा पालिकेच्या ५ कोटी ३१ लाखांच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता

CD
पासपोर्ट फोटो : 34521 (माधवी पाटील) ------------- शहादा पालिकेच्या विकासकामांना मान्यता उपनगराध्यक्ष माधवी पाटील यांची माहिती लोणखेडा, ता. ५ : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगर परिषद अंतर्गत महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) सर्वसाधारण योजना २०२६-२७ अंतर्गत शहरात विविध विकासकामांसाठी एकूण पाच कोटी ३१ लाख ७७ हजार ३३ रुपये निधीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी यासंदर्भातील प्रशासकीय मान्यता दिली, अशी माहिती उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांनी दिली. या योजनेंतर्गत शहादा शहरातील विविध रस्त्यांचे मजबुतीकरण, निर्माण कार्य आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासाचा समावेश आहे. आमदार राजेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागांत मान्यता मिळालेल्या प्रमुख कामांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा रस्त्यासाठी ९२ लाख ५९ हजार ९९६ रुपये, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा रस्त्यासाठी ९२ लाख ४३ हजार ५३१ रुपये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते सिद्धार्थनगरपर्यंत रस्त्यासाठी ७१ लाख १२ हजार ३४९ रुपये, स्टेट बँक ते जुनी मोहिदा चौफुलीपर्यंत रस्त्यासाठी ८६ लाख १८ हजार ६७३ रुपये, सरवर मंडप ते आनंद बॅटरीपर्यंत रस्त्यासाठी ९४ लाख ६२ हजार ३९६ रुपये, भारत पेट्रोलपंप (जुनी एचडीएफसी बँक) ते नवा प्रकाश रोडपर्यंत रस्त्यासाठी ९४ लाख ८० हजार ८८ रुपये याप्रमाणे निधी मंजूर झाला. या सर्व कामांसाठी शासन हिस्सा ४५ लाख २० हजार ४७९ रुपये असून, पालिकेचा १५ टक्के हिस्सा सात लाख ९७ हजार ६५५ रुपये असणार आहे. संबंधित कामांची अंमलबजावणी करताना महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानाच्या शासकीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे पालिका मुख्याधिकाऱ्यांना बंधनकारक राहणार आहे. कामाची गुणवत्ता राखत ही विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. आमदार राजेश पाडवी यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शहरातील विविध भागांत विकासकामांना मंजुरी मिळाल्याची माहिती उपनगराध्यक्ष माधवी पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drought Relief: पाच हजारांची मदत ७३ लाख शेतकऱ्यांना;फडणवीस : उर्वरितांना दोन दिवसांत रक्कम मिळणार

Satara Farmer Loan Waiver: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ, चौथी यादी जाहीर

Navi Mumbai: माजी मंत्र्याचा अनधिकृत कारभार? मोरबे धरण क्षेत्रात अलिशान फार्म हाऊसची उभारणी, नवा वाद पेटण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update : गोंदियातील ५१ शिवभोजन केंद्रचालकांचं ५ महिन्यांचं अनुदान प्रलंबित

IPL 2027 Trade: चेन्नई सुपर किंग्सने हार्दिक पांड्याला 'ठेंगा' दाखवला; SRH चे दोन तगडे खेळाडू आपल्या संघात घेतले, त्याबदल्यात कोणाला दिले?

SCROLL FOR NEXT