A procession of devotees in the temple hall.  esakal
नाशिक

Shakambari Navratrotsav : आदिमाया सप्तशृंगीचरणी लाखो भाविक नतमस्तक

सकाळ वृत्तसेवा

वणी (जि. नाशिक) : ‘आई अंबेचा उदो उदो, सप्तशृंगी माते की जय’...चा जयघोष व पुरोहितांचा मंत्रघोषात धनुर्मासातील आज तिसऱ्या रविवारी व नव वर्षाचे सुर्यनारायणाने आपले पहिले सूर्यकिरणाने सप्तशृंगीचे चरण व करस्पर्श करीत किरणोभिषेक केला.

धनुर्मास उत्सव, शाकंबरी नवरात्रोत्सव व नव वर्षाचे स्वागत असा त्रिवेणी योग व त्यात रविवार व नाताळाच्या सुट्यांची पर्वणी साधत आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या वणी गडावर लाखावर भाविक आदिमायेचरणी नतमस्तक झाले. आदिमायेकडे नववर्ष सुख समृद्धी व भरभराटीचे जावे यासाठी देवीकडे मनोभावे प्रार्थना करीत आशीर्वाद घेतले. (Shakambari Navratrotsav Millions of devotees bow before Adimaya Saptashring edvi mandir nashik news)

धनुर्मासात दर रविवारी स्वयंभू अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी (वणी) गडावर आदिमायेच्या मूर्तीवर सूर्योदयाचे तेजस्वी किरणे नतमस्तक होतात. यानंतर देवीची महाआरती होऊन उष्णतावर्धक पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो. हे दृश्य याची देही, याची डोळा बघण्यासाठी देशभरातून भाविक वणी गडावर हजेरी लावत आहे.

थंडीच्या कडाक्यातही भाविकांची गर्दी

नाताळाच्या सुट्ट्यांची पर्वणी व नववर्षाच्या निरोप व स्वागतासाठी भाविकांबरोबरच पर्यटकांनी भटकंतीसाठी सप्तश्रृंगी गडावर तीर्थाटन करीत नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. गेल्या चार पाच दिवसांत सप्तश्रृंगी गडावर भाविकांच्या होत असलेल्या गर्दीने आज उच्चांक प्रस्थापित केल्याने गडावर चैत्रोत्सवासारखे वातावरण निर्माण झाले होते.

गडावर साजरा होत असलेला धनुर्मास उत्सवातील देवीची होणारी पंचामृत महापूजा व किरणोत्सवासाठी थंडीच्या कडाक्यातही भाविकांची मोठी गर्दी झाली होती. रविवारी (ता.१) पहाटे पाचपासून पुरोहित्यांच्या मंत्रघोषात पंचामृत महापूजेस सुरवात झाली.

Devotees waiting to board the funicular rope way trolley to the temple.

सायकांळपर्यंत पहिल्या पायरीपर्यंत रांग

धनुर्मासातील व त्यात नवीन वर्षातील सुर्यनारायणाचे पहिले कोवळे किरणांनी आई भगवतीच्या मूर्तीला स्पर्श करताच भाविकांनी एकच जल्लोष करीत आई भगवतीच्या जयघोषाने अवघा सप्तश्रृंगी गडावर निनाद गुंजला.

भाविकांची गर्दी सकाळी आठपासून उत्तरोत्तर वाढत गेल्याने भाविकांच्या रांगा दुपारी बारा राममंदिर टप्प्यापर्यंत तर दुपारी तीनला पहिल्या पायरीपर्यंत लागल्या होत्या. सायकांळपर्यंत पहिल्या पायरी पर्यंत रांगा कायम होत्या.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

रोपवेद्वारे जाण्यासाठी तीन तासांची प्रतीक्षा

भाविक मोठ्या प्रमाणात खासगी वाहनांनी दाखल झाल्यामुळे गडावरील वाहतूक यंत्रणा काही काळ कोलमडून गेली होती. त्यात पोलिसांची संख्या कमी असल्याने वाहतूक यंत्रणा सुरळीत होण्यासाठी पोलिसांची व वाहनचालकांचीही दमछाक झाली. दुपारी गर्दी वाढल्याने खासगी वाहनांना धोंड्या कोंड्याच्या विहिरीजवळ थांबवण्यात आले.

भाविकांची गर्दी लक्षात घेता, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची संख्या कमी असल्याने भाविकांना नाइलाजास्तव खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत होता. फनिक्युलर रोपवेद्वारे मंदिरात पोचण्यासाठी तीन तासांची प्रतीक्षा करावी लागली. भाविकांच्या गर्दीने गडावर यात्रोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले. दिवसभर गडाच्या मार्गावर भाविकांच्या वाहनांची रीघ लागली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींची ‘गमछा सिग्नेचर स्टाईल’ परत एकदा चर्चेत! बिहार निकालानंतर अनोखा अंदाज व्हायरल, ‘गमछा वेव्ह’चा व्हिडीओ इंटरनेटवर ट्रेंडिंग

Akola News : जन्म दाखले जमा न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार २०० प्रमाणपत्रांचा सुगावा नाही; किरिट सोमय्या यांची माहिती!

Bihar Election Result 2025 Live Updates : रामकृपाल यादव दानापूर मतदारसंघातून विजयी, निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...

Pune News : नवले पूल येथे झालेल्या अपघातानंतर समन्वय बैठक; सहा महिन्यात करणार सुधारणा

Dr. Neelam Gorhe : अपघात रोखण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात

SCROLL FOR NEXT