नाशिक

शालार्थ आयडी घोटाळा : अमोल कुलकर्णीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

CD
लोगो : शालार्थ आयडी घोटाळा अमोल कुलकर्णीचा अटकपूर्व जामीन नामंजूर --- नाशिक रोड पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा; उच्च न्यायालयाचा निर्णय सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १६ : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणातील संशयित आरोपी अमोल रमेश कुलकर्णी याचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. न्यायाधीश माधव जे. जामदार यांनी बुधवारी (ता. १४) आदेश दिला. नाशिक रोड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक १६४/२०२५ च्या अनुषंगाने अर्ज करण्यात आला होता. नाशिक विभागातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप आहे. २०२२ ते २०२४ या कालावधीत झालेल्या नियुक्त्या यापूर्वीच्या कालावधीत झाल्याचे दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाकडून वेतनाची थकबाकी मिळविल्याचा संशयितांकडून करण्यात आला होता. या प्रकरणात एकूण ९६ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांचा संदर्भ न्यायालयाच्या आदेशात नमूद आहे. अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) येथील एम. एफ. तराळ विद्यालयातील १७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांबाबतही आरोप करण्यात आले आहेत. या नियुक्त्या २०२४ मध्ये झाल्या असताना त्या २०१४ ते २०१७ या कालावधीत झाल्याचे दर्शवून दोन कोटी रुपयांहून अधिक वेतन थकबाकीची मागणी करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. तपासादरम्यान विद्यालयाचे तत्कालीन मुख्याध्यापक रामदास एस. पाटील यांनी दिलेल्या जबाबाचाही न्यायालयाने विचार केला. नियुक्तीच्या प्रस्तावांशी संबंधित कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास त्यांनी नकार दिल्याचे त्यांच्या जबाबात नमूद आहे. तसेच, नियुक्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून संशयित पैसे गोळा करीत असल्याची बाब तपासात समोर आल्याचे न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. संशयित शिपाई पदावर कार्यरत असून, वरिष्ठांच्या निर्देशानुसार काम करीत असल्याचा युक्तिवाद त्याच्या वतीने करण्यात आला. मात्र, उपलब्ध कागदपत्रे, साक्षीदारांचे जबाब आणि तपासातील कथित भूमिकेचा विचार करून उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास पुरेसा आधार नसल्याचे स्पष्ट करीत अर्ज फेटाळला. त्यामुळे त्याची अटक अटळ आहे. या निर्णयामुळे शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणातील तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली. अटकपूर्व जामीन फेटाळण्याचे महत्त्वाचे निष्कर्ष - शालार्थ आयडी घोटाळ्यात बनावट व मागील तारखेच्या नियुक्त्या दाखवून वेतनाची थकबाकी मिळविल्याचा गंभीर आरोप आहे. - संबंधित शाळेतील १७ कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांबाबत दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या थकबाकीचा मुद्दा न्यायालयासमोर होता. - संशयित अमोल कुलकर्णी याची कथित भूमिका केवळ शिपाई म्हणून काम करण्यापुरती नव्हती. - नियुक्तीच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या मिळविणे, नियुक्त कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा करणे असा फंडा असल्याचे तपासात समोर आल्याचे आदेशात नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: नव्या पर्वाची सुरुवात पण स्मृती मंधाना आणि झिम्बाब्वेच्या खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानावर का उतरले? नेमकं काय घडलं?"

Raju Shetty : केंद्र सरकारचे नाक दाबण्यासाठी साखर उत्पादन बंद करा; राजू शेट्टी यांचे आवाहन

Elon Musk: ''मी कोणत्याही गोऱ्या व्यक्तीला देशाच्या निर्णयात हस्तक्षेप करू देणार नाही''; इलॉन मस्क वादावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: शहरात १०% पाणीकपात, तरीही टँकरने धुतले BRT चे डिव्हायडर; नागरिकांमधून संताप

SCROLL FOR NEXT