नाशिक

गरुड बंधूंच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी

CD
शालार्थ आयडी घोटाळा (लोगो वापरणे) --------------- गरुड बंधूंच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ४ : राज्यभर गाजत असलेल्या १६० कोटींच्या शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी संजय गरुड याच्या जामीन अर्जावर सुनावणी बुधवार (ता. ७)पर्यंत ढकलण्यात आली आहे. शेंदुर्णी (ता. जामनेर) शिक्षण संस्थेचा अध्यक्ष संजय गरुड, सहसचिव दीपक गरुड हे बंधू सध्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. जामनेरच्या शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड यास गेल्या २७ जुलैला सोलापूर जिल्ह्यातील फार्महाउसवरून नाशिक शहर गुन्हे शाखेने अटक करण्यात आली होती. तर याच संस्थेचा सहसचिव व संजय गरुडचा भाऊ दीपक गरुडलाही अटक करण्यात आली. सध्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोघांनी जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. संजय गरुड याच्या जामिनावर युक्तिवाद होऊन त्यावरील सुनावणी बुधवारी (ता. ७) होणार आहे. तर, दीपक गरुड यानेही जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली असून, त्यावरही बुधवारीच (ता. ७) सुनावणी होणार आहे. दरम्यान, शालार्थ आयडीप्रकरणी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तपासकामी दोन सहायक आयुक्त सचिन बारी व संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली पथके नेमली आहेत. या पथकांकडून उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगावमधील शाळांची झाडाझडती सुरू आहे. तर गुन्ह्यात समाविष्ट असलेल्या तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यासह काही अधिकाऱ्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयापाठोपाठ मुंबई उच्च न्यायालयानेही फेटाळून लावले आहेत. यातील काही संशयित शिक्षणाधिकारी पसार असून, त्याचा शहर गुन्हे शाखेची पथके कसून शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT