नाशिक

शानभाग विद्यालयाच्या मुलींच्या कबड्डी संघाचे तालुकास्तरीय विजेतेपद

CD
NSK26H31654 जळगाव : तालुकास्‍तरीय कबड्डी स्‍पर्धेत विजेत्या ठरलेल्‍या शानभाग विद्यालयाच्‍या मुलींच्‍या संघासमवेत मान्‍यवर. ––– ‘शानभाग’ मुलींच्या संघाला कबड्डी स्‍पर्धेचे विजेतेपद सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ७ : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्‍या तालुकास्‍तरीय कबड्डी स्‍पर्धेत शानभाग विद्यालयाच्‍या मुलींच्‍या संघाने विजेतेपद पटकाविले. आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयात सदर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आज (ता.७) पार पडल्या. या स्पर्धेत विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. श्रीमती ब. गो. शानभाग विद्यालयाच्या १४ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. या कामगिरीमुळे संघाची आगामी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दरम्यान, १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघानेही दमदार कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत झाली. मात्र शानभाग विद्यालयाच्या संघाला अवघ्या तीन गुणांनी पराभव स्वीकारावा लागला. स्पर्धेसाठी खेळाडूंना विद्यालयातील क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. मुलींच्या संघाच्या विजेतेपदाबद्दल तसेच मुलांच्या संघाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शालेय व्यवस्थापन मंडळ विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, विभाग प्रमुख रुपाली पाटील, स्वप्नील पाटील, क्रीडा शिक्षक आणि शालेय परिवारातील सदस्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas Athawale on Gyanesh Kumar : 'ज्ञानेश कुमार काहीही झाले तरी राजीनामा देणार नाहीत'; अभिजीत दीपकेंच्या आंदोलनावर रामदास आठवले स्पष्टच बोलले, दिला कडक इशारा

Pune News : खेळाच्या मैदानावरील अनधिकृत इमारत महापालिकेच्या बांधकाम विभागाने केली जमीनदोस्त

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक विधान परिषद निवडणुकीसाठी ४८ उमेदवार रिंगणात; ९ ऑक्टोबरला माघारीची अंतिम मुदत

Uruli Kanchan News : पोलिसांच्या कर्तव्य भावनेने मजूर दांपत्याला मिळाला आधार! खाकी वर्दीतील माणुसकी आली धावून

Ishan Kishanने मोडला विराट कोहलीचा १० वर्षे जुना विक्रम; भारतीय खेळाडूंच्या 'या' लिस्टमध्ये अव्वल

SCROLL FOR NEXT