NSK26H31773
जळगाव : जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत यश संपादन करणारे शानभाग विद्यालयाचे जलतरणपटू कार्तिकी भोसले, ऐश्वर्या खडके, प्राची खंडारे व आदित्य पाटील.
जलतरण स्पर्धेत ‘शानभाग’च्या चमकदार कामगिरी
कार्तिकी भोसले, ऐश्वर्या खडकेचा विविध प्रकारांत प्रथम क्रमांक
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ९ : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि पंचायत समिती शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत विवेकानंद प्रतिष्ठान संचलित ब. गो. शानभाग विद्यालयाच्या जलतरणपटूंनी घवघवीत यश संपादन केले. ८ ऑक्टोबरला कोकिळ गुरुजी जलतरण तलाव येथे झालेल्या या स्पर्धेत विद्यालयाच्या खेळाडूंनी विविध प्रकारांत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावत क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली.
१७ वर्षांखालील मुलींच्या गटात कार्तिकी पंकज भोसले हिने १०० मीटर व ५० मीटर बॅकस्ट्रोक तसेच २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारांत प्रथम क्रमांक मिळविला. ऐश्वर्या सतीश खडके हिने ५० मीटर व १०० मीटर फ्रीस्टाइल आणि ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक या प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावला. प्राची संदीप खंडारे हिने ५० मीटर फ्रीस्टाइल व ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारांत द्वितीय क्रमांक मिळविला. मुलांच्या गटात आदित्य बन्सीलाल पाटील याने २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक आणि इंडिव्हिज्युअल प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवत विद्यालयाच्या यशात भर घातली.
या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन मंडळ, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, विभागप्रमुख रूपाली पाटील व स्वप्नील पाटील, विद्या समितीप्रमुख जगदीश चौधरी यांनी खेळाडूंचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.