नाशिक

शनि अमावस्येनिमित्त शनी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी महाबळ, बळीराम पेठेसह विविध मंदिरांत सकाळपासून दर्शनासाठी रांगा

CD
टुडे पान ३ : NSK26H31906 जळगाव : शनी अमावस्येनिमित्त शनिपेठेतील शनी मंदिरात झालेली गर्दी. ----- शनी अमावस्येनिमित्त मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी महाबळ, बळीरामपेठेसह विविध मंदिरांत रांगा; हजारो लिटर तेल अर्पण सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १० : शनि अमावस्येनिमित्त शनिवारी शहरातील विविध शनी मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. महाबळ परिसरातील शनी मंदिर, बळीराम पेठेतील शनी मंदिर तसेच पंचमुखी हनुमान मंदिराजवळील शनी मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शनिदेवाचे दर्शन घेऊन तेल अर्पण करण्यासह पूजा-अर्चा आणि विविध धार्मिक विधी करण्यासाठी भाविकांची दिवसभर वर्दळ सुरू होती. शहरातील विविध भागांतील शनी मंदिरांमध्येही भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. शनि अमावस्येला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व असल्याने शनिवारी सकाळपासूनच भाविकांनी मंदिरांकडे धाव घेतली. अनेक भाविकांनी कुटुंबीयांसह मंदिरात जाऊन शनिदेवाचे दर्शन घेतले. मंदिरांमध्ये तेल अर्पण करण्यासाठी तसेच पूजा-अर्चा करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्याने मंदिर परिसरात दिवसभर वर्दळ दिसून आली. महाबळ परिसरातील शनी मंदिरात सकाळपासून भाविकांची ये-जा सुरू होती. बळीराम पेठेतील शनी मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. पंचमुखी हनुमान मंदिराजवळील शनी मंदिरात शनिदेवाच्या दर्शनासोबतच तेल अर्पण करण्यासाठी भाविकांनी उपस्थिती लावली. शहरातील अन्य भागांतील शनी मंदिरांमध्येही भाविकांनी श्रद्धेने पूजा-अर्चा केली. सुख-समृद्धीसाठी प्रार्थना शनि अमावस्येनिमित्त शनिदेवाला तेल अर्पण करण्याला विशेष महत्त्व दिले जाते. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध शनी मंदिरांमध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणावर तेल अर्पण केले. मंदिरांमध्ये हजारो लिटर तेल अर्पण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. शनिदेवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी तेल अर्पण करून प्रार्थना केली. तसेच आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी शनिदेवाला साकडे घातले. चौकट धार्मिक वातावरणात पूजा-अर्चा शनि अमावस्येनिमित्त अनेक भाविकांनी शनिदेवाच्या दर्शनासोबतच धार्मिक विधींमध्ये सहभाग घेतला. काही भाविकांनी सकाळी लवकर मंदिरात जाऊन दर्शन घेण्यास प्राधान्य दिले. दिवसभर मंदिर परिसरात धार्मिक वातावरण होते. श्रद्धा आणि भक्तिभावाने भाविकांनी शनिदेवाची पूजा केली. शहरातील विविध शनी मंदिरांमध्ये झालेल्या गर्दीमुळे शनि अमावस्येचा धार्मिक उत्साह दिसून आला. शनिदेवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसरात दिवसभर वर्दळ कायम होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT