फोटो : NSK26H31891
शनिमांडळ : शनिदेवाचे विधीवत पुजन करताना आमदार डॉ. विजयकुमार गावित.
-----------------
दुष्काळ मिटू दे अन् बळीराजाला सुखी होऊ दे!
आमदार डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १० : राज्याचे माजी आदिवासी विकासमंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी शनि अमावस्येनिमित्त नंदुरबार तालुक्यातील श्रीक्षेत्र शनिमांडळ येथील शनी मंदिरात जाऊन शनि महाराजांचे दर्शन घेतले. ‘राज्यावर आलेले दुष्काळाचे संकट दूर होऊ दे आणि शेतकरी राजा सुखीसंपन्न होण्यासाठी भरपूर पर्जन्यमान होऊ दे’ असे साकडे त्यांनी शनि महाराजांना घातले. या वेळी डॉ. गावित यांच्या हस्ते विधीवत पूजन करून बळीराजासाठी प्रार्थना करण्यात आली.
शनिदर्शनानंतर आमदार डॉ. गावित यांनी शनिमांडळ, तलवाडे तसेच तिलाली शिवारातील शेतकरी, ग्रामस्थांशी संवाद साधला. येणाऱ्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. आगामी काळात पाणीटंचाई निर्माण झाल्यास प्रत्येक गावाने, शेतकऱ्यांने काय दक्षता घ्यावी, कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत मार्गदर्शन केले. शनि महाराजांच्या तीर्थक्षेत्रात भक्तांना कुठल्याही अडचणी येऊ नये व परिसरात मोकळ्या जागेत भक्तांना दर्शन घेता यावे, याकरीता सुख सुविधांबाबत चर्चा केली. तत्पूर्वी त्यांनी शनिदेवाच्या चरणी मनोभावे विधिवत पूजा करून प्रार्थना केली.
या वेळी भाजपाच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील, शनी मंदिर ट्रस्टचे सदस्य जगदीश पाटील, ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.