Sharad Pawar esakal
नाशिक

Sharad Pawar: "नरेंद्र मोदींना मी इस्त्राइलला घेऊन गेलो होतो"; शरद पवारांनी संपूर्ण इतिहास काढला

Sharad Pawar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुंबईत शरद पवार यांच्यावर टीका केली. कांदा प्रश्नावर मोदींनी सवाल केला होता. त्यावर शरद पवार यांनी जोरदार पलटवार केला.

Sandip Kapde

Sharad Pawar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (बुधवार) मुंबईत रोड शो घेतला. यावेळी त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. दरम्यान आज पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर पलटवार केला. नरेंद्र मोदी यांच्या रोड शोमुळे लोकांना त्रास झाल्याचे शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांनी कांद्यासाठी काय केलं, असे मोदी म्हणाले. यावर शरद पवारांनी उत्तर दिलं. मोदी मी काय केलं विचारतात. त्यांचा १० वर्षाचा अनुभव बघा. मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांच्या राज्यातील शेतीचा कोणताही विषय असला तर ते माझ्याकडे यायचे. मला घेऊन गुजरातला जायचे. 

एकदा असं झालं की मी इस्त्राइलला जात होतो आणि मोदींनी मला फोन केला. कारण त्यांचा विझा नाकारला होता.  त्यांनी सांगितलं मला ईस्त्राइलला येऊन सर्व अभ्यास करण्याची इच्छा आहे. त्यावेळी मी त्यांना घेऊन गेलो होतो. ईस्त्राइलचं शेती तंत्रज्ञान सर्व गोष्टी त्यांना चार दिवस दाखवल्या. हे सगळं माहित असताना मोदी बोलतात म्हणजे ते फक्त राजकारण करत असल्याची टीका शरद पवार यांनी केली. 

नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास गेलेला आहे. त्यामुळे ते जाती धर्मावर बोलतात. मुख्यमंत्री असताना त्यांना शेतीचे प्रश्न पडायचे आता त्यांना पडत नाहीत. आता त्यांना राजकारणात रस आहे, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले, धुळे, नाशिक, सातरा भागात कांद्याचे प्रश्न आहेत. मोदी येतात मात्र शेतीच्या प्रश्नावर बोलत नाहीत. त्यामुळे शेतकरी आक्रमक आहेत. मोदी फक्त राजकारण करण्यासाठी माझ्यावर टीका करतात.

मुंबईसारख्या शहरात रोड शो करणे शहाणपणाचं लक्षण नाही. लोकांना तासनतास थांबावं लागतं. त्यांनी कार्यक्रम घेतला तो गुजराती परिसर आहे. त्यांचं लक्ष फक्त एका वर्गाकडे होतं. लोकांना खूप त्रास झाल्याचे शरद पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj Viral Video : स्वच्छतागृहात शिवरायांचा अन् राणी पद्मावतींचा फोटो; नेटकऱ्यांनी आक्षेप घेताच बदलला फोटो...

Hulikunteshwara Temple : 'देवा, माझी सासू पुढील वर्षीच्या जत्रेपूर्वी मरू दे..'; दानपेटीत आढळलेल्या 100 रुपयांच्या नोटेवरील मजकूराने खळबळ, कोणी लिहिलं असं?

Latest Marathi News Live Update : अजितदादांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Summer Fruit Shopping Tips: गोड की केमिकल? कलिंगड खरेदी करताना ‘या’ 5 टिप्स नक्की तपासा

अजितदादा महाराष्ट्राला न लाभलेले मुख्यमंत्री, त्यांनी पहिल्यांदा टायमिंग चुकवलं; CM फडणवीसांनी सांगितल्या आठवणी, शेवटची भेट...

SCROLL FOR NEXT