sharad pawar first meeting in yeola today nashik news esakal
नाशिक

Nashik Sharad Pawar : शरद पवार आज येवल्याच्या रणांगणात; पक्ष सोडून गेलेल्यांविरोधात फुंकणार रणशिंग

सकाळ वृत्तसेवा

Nashik Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले असून, कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ला असलेल्या येवल्यात शनिवारी (ता. ८) जाहीर सभा होत आहे. (sharad pawar first meeting in yeola today nashik news)

शरद पवार यांची राज्यातील ही पहिलीच सभा असल्याने, सभा यशस्वितेसाठी जिल्ह्यातील शरद पवार समर्थकांनी कंबर कसली आहे. पवार यांना मानणाऱ्या वर्गाला साद घालत शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी स्थानिक पातळीवर करण्यात आली आहे. भुजबळ यांना आव्हान देण्यासाठी ही सभा होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

तरी ही सभा जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातही पक्षाचे भवितव्य ठरवणारी असणार आहे. अनुकूल- प्रतिकूल वेळी पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा नाशिक जिल्हा या वेळी पुन्हा एकदा ठामपणे पवारांच्या पाठीशी राहतील का, हेही त्या वेळी निश्चित होणार आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या बंडानंतरच्या या पहिल्याच सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

गत आठवड्यात राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यासह नऊ मंत्र्यांनी पक्षाला सुरुंग लावत मंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा राज्यात राजकीय भूकंप झाला. अजित पवार यांच्या समवेत शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे छगन भुजबळ यांनीही मंत्रिपदाची शपथ घेत भाजपच्या जोडीने सत्तेत सहभागी झाले .या सर्व घडामोडींनी सर्वांनाच धक्का बसला. मुंबईत झालेल्या बैठकांमध्ये शरद पवार यांच्यावर थेट वार करण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ही बाब सर्वेसर्वा शरद पवार यांनाही जास्त खटकली. यासाठी त्यांनी पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी राज्य दौऱ्याची घोषणा केली. यासाठी भुजबळांच्या येवल्याची निवड त्यांनी सर्वप्रथम केली. शरद पवार यांच्या राजकीय वाटचालीत नाशिक जिल्ह्याने आजवर शरद पवार यांना कायमच साथ दिली आहे. यात येवला तालुक्याची साथ मोलाची राहिली आहे.

त्यामुळेच शरद पवार यांनी येवल्याची निवड करत या रणांगणातूनच ते पक्ष सोडून गेलेल्यांविरोधात आता रणशिंग फुंकणार आहेत. या सभेसाठी जिल्ह्यात शरद पवार समर्थकांनी जय्यत तयारी केली आहे. जिल्हाभरात ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, नाशिक लोकसभेचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे आदींनी शुक्रवारी (ता. ७) ठिकठिकाणी गुप्त बैठका घेतल्या.

जिल्हा राष्ट्रवादीत मुळात भुजबळ व अजित पवार असे दोन गट होते. त्यांच्यात उघड असा संघर्ष कधी झाला नाही; पण शरद पवार यांनी नाशिकबाबतचे सर्वाधिकार भुजबळांना दिलेले असल्याने अजित पवार यांच्या समर्थकांमध्ये सुप्त नाराजी असायची.

मात्र, नव्या जुळणीत अजित पवार व भुजबळ गट एक झाले आहेत, तर अजित पवार यांना मानणारी पण भुजबळांशी फारसे न पटणारी मंडळी थोरल्या पवारांशी निष्ठावंत झाली असल्याचे बोलले जात आहे.

भुजबळांकडूनही शक्तिप्रदर्शन

शरद पवार यांची येवला येथे सभा होत असताना कॅबिनेटपदाची शपथ घेतल्यानंतर नाशिक येथे दाखल होत असलेले छगन भुजबळ यांनी शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे. सर्व भुजबळ समर्थकांनी छगन भुजबळ यांच्या स्वागतासाठी नाशिकला येण्याचे नियोजन केले आहे.

शहराच्या सीमेवर पाथर्डी फाटा येथे स्वागत केले जाणार आहे. त्यासाठी येवल्याचे समर्थकही नाशिकमध्ये येणार आहे. शरद पवार यांच्या सभेपेक्षा भुजबळांच्या स्वागताला मोठी गर्दी करून उत्तर देण्याची तयारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT