नाशिक

गरुड बंधूंच्या जामीनावरील सुनावणी सोमवारी

CD
लोगो : शालार्थ आयडी घोटाळा गरुड बंधूंच्या जामिनावर सोमवारी पुढील सुनावणी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ७ : शालार्थ आयडी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शेंदुर्णी (ता. जामनेर) शिक्षण संस्थेचा अध्यक्ष संजय गरुड आणि सहसचिव दीपक गरुड यांच्या जामीन अर्जांवरील सुनावणी सोमवार (ता. १२)पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. गरुड बंधू जुलैपासून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. संजय गरुड याच्या जामीन अर्जावर नाशिक रोड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. केदार जोशी यांच्यासमोर सुनावणी झाली. गरुड याच्यातर्फे ॲड. मंदार भानोसे आणि ॲड. अच्युत निकम यांनी बाजू मांडली. बनावट शालार्थ आयडीसाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांमध्ये संस्थाचालक म्हणून संजय गरुड याचा थेट सहभाग असल्याचे दर्शविणारा पुरावा नसल्याचा दावा त्यांनी केला. संबंधित प्रस्तावांना शिक्षण विभागाकडून मंजुरी देण्यात आली होती, तसेच तपासात गरुड याने सहकार्य केले असल्याने पुढील कोठडीची आवश्यकता नसल्याचे सांगत जामीन देण्याची मागणी करण्यात आली. सरकार पक्षाने जामीन अर्जास विरोध केला. शालार्थ आयडी प्रकरणातील मोठ्या संख्येने प्रस्ताव शेंदुर्णी शिक्षण संस्थेशी संबंधित असल्याचा दावा सरकार पक्षाने केला. तपास अद्याप सुरू असून, संजय गरुड याची सुटका झाल्यास तो तपासावर परिणाम करू शकतो किंवा पुराव्यांमध्ये हस्तक्षेप करण्याची शक्यता असल्याचे सरकार पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तपासाच्या दृष्टीने त्याची कोठडी आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले. दीपक गरुड याच्या जामीन अर्जावर बुधवारी (ता. ७) सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे दोन्ही जामीन अर्जांवरील पुढील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात धुळे आणि जळगाव जिल्ह्यांतील शाळांमधील शालार्थ आयडीसंदर्भातील कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. प्रकरणातील काही तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांसह अन्य संशयितांचे अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळले आहेत. काही संशयित शिक्षणाधिकारी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नसून, त्यांचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Building Collapse: दिल्लीत भीषण दुर्घटना! चार मजल्यांची इमारत कोसळली, गरोदर मातेसह तिघांचा मृत्यू

Beed News : बीडच्या एलसीबी पथकाचा सन्मान! अंबाजोगाईतील घरफोडीचा छडा लावून ४५ तोळे सोने, १६०० ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात धडाकेबाज कामगिरी

Vidyadhar Anaskar : आरबीआयच्या नव्या पतधोरणामुळे सर्वसामान्यांचे कर्ज महागण्याची शक्यता; समतोल राखण्याचे बँकिंग क्षेत्रासमोर आव्हान

Sakal Karandak Competition : पुणे विभागातून ‘लाजाळू’ अंतिम फेरीत; ‘ईमान’ला द्वितीय; ‘नातीगोती’ला तृतीय क्रमांक

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सातव्या दिवशीही कायम

SCROLL FOR NEXT