NSK26H31405
जळगाव : श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघातर्फे पालिताणा तीर्थ स्थित शत्रुंजय परिक्रमेत दर्शन घेताना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन/
-----
जळगावात शत्रुंजय तीर्थ परिक्रमा कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ६ : श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघातर्फे पालिताणा तीर्थ स्थित शत्रुंजय परिक्रमेचा कार्यक्रम उत्साहात झाला. पूज्य पन्यास प्रवर- राजदर्शन विजय म. सा. यांच्या कल्पनेतून शहरातील मॉडर्न गर्ल हायस्कूलच्या मैदानावर सुमारे २२ फूट उंच, तीन मजली शत्रुंजय तीर्थाची प्रतिकृती साकारण्यात आली होती. या पर्वतावर जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर आदिनाथ भगवान यांच्या मंदिराच्या १२ प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या. यामध्ये जयतलेटी, नरसी केशवजी, सवा सोमानी, छिपा वसही, साकरवसही, हेमाभाईची प्रतिकृती, मोतीशा, श्रीरायण पगला अशा प्रतिकृतींचे निर्माण करून त्यात विविध तीर्थंकर भगवानांच्या प्रतिमा स्थापन करण्यात आल्या होत्या.
यावेळी पन्यास प्रवर राजदर्शन यांनी शत्रुंजय तीर्थाचे महत्त्व विशद करून तीर्थाची संपूर्ण माहिती दिली. शिवम सिंग यांनी संगीतमय पूजन विधी करविला. संगीताच्या साथीने अनेक भाविकांनी पूजनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हार्दिक शाह यांनी केले.
या कार्यक्रमास जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी महापौर प्रदीप रायसोनी, नयनतारा बाफना, दिलीप गांधी, नयन शाह, शांतिलाल जैन, ललित लोडाया, जितेंद्र शाह, स्वरूप लुंकड, रजनीकांत कोठारी, राजेंद्र बलाई आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत मंदिराचे ट्रस्टी दिलीप गांधी यांनी केले. चेतन संघवी, संजय गांधी, किरण निबजिया, संजय कासवा, कल्पेश नाणेशा, महिपाल निबजिया, प्रशांत नाणेशा यांनी सहकार्य केले.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.